गावगाथा

धर्म, संस्कृती आणि रुढी परंपरा जपण्यात वटवृक्ष देवस्थान अग्रेसर – अभिनेत्री आर्या आंबेकर

अभिनेत्री आर्या आंबेकर यांचा वटवृक्ष मंदीरात महेश इंगळे यांच्या हस्ते सत्कार.

धर्म, संस्कृती आणि रुढी परंपरा जपण्यात वटवृक्ष देवस्थान अग्रेसर – अभिनेत्री आर्या आंबेकर
अभिनेत्री आर्या आंबेकर यांचा वटवृक्ष मंदीरात महेश इंगळे यांच्या हस्ते सत्कार.
(श्रीशैल गवंडी, अ.कोट, दि.२२/०७/२६)
धर्म, संस्कृती आणि रुढी परंपरा जपण्यात येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे योगदान राज्यात अग्रेसर असल्याचे मत छोट्या व मोठ्या पडद्यावरील प्रसिद्ध मराठी गायिका व अभिनेत्री आर्या आंबेकर यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी समर्थांच्या दर्शनाकरीता येथे आले असता बोलत होते. याप्रसंगी वटवृक्ष मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी आर्या आंबेकर यांचा श्रींचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सत्कार केला.
पुढे बोलताना अभिनेत्री आर्या आंबेकर
यांनी आपण मागील पंधरा वर्षापासून
श्री स्वामी समर्थांचे निस्सिम भक्त आहोत. आज स्वामींच्या दर्शनाकरिता अक्कलकोटला येण्याचे भाग्य लाभल्याने आनंद झाले असल्याचे सांगून येथील प्रसन्न स्वामीमय वातावरण, स्वच्छ व सुंदर मंदिर परिसर यामुळे वटवृक्ष देवस्थान हे एक जागृत देवस्थान आहे येथे स्वामींचा सहवास साक्षात अनुभवता आल्याचे सांगून भविष्यातही वटवृक्ष देवस्थान समितीकडून धर्म, संस्कृतीच्या रुढी परंपरा नियमीतपणे जपण्यात यावे असेही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी बोलताना मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी अभिनेत्री आर्या आंबेकर हे एक निस्सिम स्वामी भक्त आहेत. स्वामी समर्थांच्या आशिर्वादानेच त्यांना छोट्या व मोठ्या पडद्यावर अभिनय क्षेत्रात भरभरुन यश मिळाले आहे. त्याचे फळ त्यांना विविध पुरस्कारांनी लाभले असल्याचे मनोगत व्यक्त करून त्यांच्या भावी वाटचालीस स्वामीचे आशिर्वाद व शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी प्रसाद सोनार, अविनाश क्षीरसागर, सागर गोंडाळ, श्रीशैल गवंडी, स्वामीनाथ लोणारी, गिरीश पवार, आदि उपस्थित होते.
फोटो ओळ – अभिनेत्री आर्या आंबेकर यांचा सत्कार करताना चेअरमन महेश इंगळे दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button