ध्यानामुळे जीवन भयमुक्त, रोगमुक्त आणि चिंतामुक्त होते.
“ब्रह्मर्षी सुभाष पत्रीजी” चित्रपट पाहून चेअरमन महेश इंगळे यांचे उद्गार
(श्रीशैल गवंडी, अ.कोट, दि.२३/०७/२६)
ब्रह्मर्षी सुभाष पत्रीजी यांनी मानवसेवेच्या मार्गात आले सर्व कटू अनुभव झुगारून दिले आणि यशाच्या शिखरापर्यंत मजल मारली. स्पिरीच्युअल पिरॅमिडिकचे कार्य आणि आत्म परिवर्तनाचा संदेश यातून मिळतो. हा चित्रपट म्हणजे प्रत्येकाच्या जीवनात ध्यानाचे बीज रोवणारा एक दिव्य अनुभव आहे. चित्रपटातून ध्यानामुळे जीवन कसे भयमुक्त, रोगमुक्त आणि चिंतामुक्त होते याचा बोध मिळतो असे उद्गार येथील
श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी काढले.
नुकतेच ब्रह्मर्षी सुभाष पत्रीजी यांच्या जीवनावर आधारित तेलुगु भाषेतील “ब्रह्मर्षी सुभाष पत्रीजी” या चित्रपटाचा विशेष शो आणि ध्यान साधनेचे आयोजन सोलापूर येथे करण्यात आले होते.
या कार्यक्रमात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महेश इंगळे बोलत होते.
पुढे बोलताना महेश इंगळे यांनी
जगभरात २५० थिएटरमध्ये एकाच वेळी प्रदर्शित झालेला हा चित्रपट ध्यानाचे महत्त्व आणि त्याचे जीवनावरील सकारात्मक परिणाम अधोरेखित करतो हे प्रभावीपणे दाखवले आहे.
ध्यानामुळे आरोग्य सुधारते आणि जीवनाचा आनंद निरामयपणे घेता येतो हाच संदेश यात दिला आहे. हा चित्रपट प्रत्येकाने पाहावा आणि ध्यानाला दैनंदिन जीवनात स्थान द्यावे असे सांगून चित्रपटानंतर उपस्थित मान्यवरांनीही ध्यानाच्या प्रसारासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प करावा असे आवाहन केले. या कार्यक्रमाला प्रथमेश मालक इंगळे,
नगरसेवक अविनाश मडीखांबे, विद्याधर गुरव सर, संतोष जवळगे, चंद्रशेखर रेड्डी, पुरणचंद्र राव, परमानंद अलगोंडा पाटील, आनंद गांगजी, नेहा मिराजगावकर, रोहित वंगारी, देवयानी नवगजे, संतोष पराणे, मनोज जगताप सर, सुनील पवार, कल्याणी गंगोंडा सर, अशोक कलशेट्टी सर, देवरमणी सर, दत्ता कटारे, रफिक पठाण, अंकुश केत, बाळासाहेब एकबोटे, डॉ.राजू मलंग, मनोज इंगोले, तुषार मोरे, स्वामीराव मुसळे, सिद्धाराम बिडवे, प्राचार्य शिवराय अडीवीतोटे सर, मेजर अमोल माने, अमर पाटील, सुनिल पवार, ओमकार उठगे साहेब, माणिक माशाळे, कुमार हत्तुरे मालक, रमेश कनमोसे मालक, श्रीकांत झिपरे, स्वामीराव मुसळे व सर्व महेश मालक इंगळे मित्र परिवार तसेच स्विमिंग ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!