ॲड.मिलिंद थोबडे यांचा वटवृक्ष मंदीरात चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार.
(श्रीशैल गवंडी, अ.कोट, दि.२५/०७/२६)
महाराष्ट्र व गोवा राज्य बार असोसिएशनचे सदस्य ॲड.मिलिंद थोबडे यांचा त्यांच्या सामाजिक आणि विधी क्षेत्रातील कार्याबद्दल येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात सपत्नीक सत्कार करण्यात आला.
विधी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान, सामाजिक बांधिलकी आणि जनसेवेसाठी त्यांच्या कार्याची दखल घेऊन श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने देवस्थान समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी ॲड मिलिंद थोबडे यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद प्रतिमा देऊन
हा सत्कार केला.
यावेळी बोलताना ॲड.मिलिंद थोबडे म्हणाले की हा सत्कार म्हणजे माझ्या कार्याची पावती आहे. कायद्याच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देणे हेच माझे ध्येय आहे.
या कार्यात माझ्या पत्नीची मोलाची साथ आहे. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने भविष्यातही समाज हितासाठी आणि विधी क्षेत्रासाठी कार्यरत राहण्याचा माझा प्रयत्न राहील. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, श्रीशैल गवंडी, श्रीकांत मलवे, विपुल जाधव, मिलिंद साळुंखे, प्रशांत गुरव व परिसरातील ज्येष्ठ वकील, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी ॲड. थोबडे दाम्पत्याला पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
फोटो कॅप्शन – महाराष्ट्र व गोवा राज्य बार असोसिएशनचे सदस्य ॲड.मिलिंद थोबडे आणि सौ.थोबडे यांचा सत्कार करताना महेश इंगळे दिसत आहेत
Back to top button
×
No WhatsApp Number Found!