गावगाथा

*प्रत्येक माणसाने आपल्या जीवनात तीन ऋण फेडायचे असतात मातृ ऋण समाज ऋण आणि भूमातेचे ऋण आणि ती फेडण्याचे काम निसर्गसेवा फाउंडेशनच्या सर्व स्वयंसेवकांनी करीत आहे ; मौनमुनी जडेय शांतलिंगेश्वर महास्वामीजी*

निंबाळ मठाचे मठाधीश मोन मुनी जडेय शांतलिंगेश्वर महास्वामीजी यांनी प्रसंगी त्यांचा सन्मान व सत्कार केले.

*🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
*प्रत्येक माणसाने आपल्या जीवनात तीन ऋण फेडायचे असतात मातृ ऋण समाज ऋण आणि भूमातेचे ऋण आणि ती फेडण्याचे काम निसर्गसेवा फाउंडेशनच्या सर्व स्वयंसेवकांनी करीत आहे ; मौनमुनी जडेय शांतलिंगेश्वर महास्वामीजी*

ते कर्नाटकातील श्री क्षेत्र निंबाळ मठ येथील वार्षिक पालखी महोत्सवाचे औचित्य साधून अक्कलकोट येतील निसर्गसेवा फाउंडेशनच्या वतीने निंबाळ गावचे संपूर्ण स्वच्छता करण्यात आले यावेळी आयोजित कार्यक्रमात मोहनमुनी जडेय शांतलिंगेश्वर महास्वामीजी बोलत होते.

कर्नाटकातील श्रीक्षेत्र निंबाळ येथे ग्रामदैवताच्या वार्षिक पालखी महोत्सवाचे अवचित साधून अक्कलकोट येथील निसर्ग सेवा फाऊंडेशनच्या वतीने गावचे झाड लोड करणे सर्व कचरा संकलित करणे त्याची विल्हेवाट लावणे गावातील सर्व तुंबलेल्या गटारी काढणे आदी कामे दोनशेहून अधिक निसर्गसेवा फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी केलेला आहे या फाउंडेशन मध्ये बहुतांश उद्योगपती व्यापारी शासकीय कर्मचारीसह मोलमजुरी करणारे स्वयंसेवक आहेत.

सदरील निसर्ग सेवा फाऊंडेशनची स्थापना 3 मार्च 2021 रोजी 25 स्वयंसेवकांनी एकत्र येऊन केले होते. त्या फाउंडेशन मध्ये आज मीतिला दोनशे हुन अधिक स्वयंसेवकांनी सामील होऊन निसर्ग सेवा करीत आहेत. या संस्थेने आज पर्यंत स्मशानभूमी स्वच्छता अक्कलकोट शहरासह ग्रामीण भागातील बहुतांश मोठ मोठ्या गावात जत्रा यात्रा महोत्सव उत्सवाच्या कार्यकाळामध्ये झालेल्या सर्व कचऱ्याचे साफसफे करणे आणि त्याचे विल्हेवाट लावण्याचे कामाबरोबरच वृक्षारोपण संगोपन मुक्या जनावरांना पाण्याची सोय स्वखर्चाने करीत आहेत.

निसर्ग सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील बिराजदार विद्याधर गुरव नीलकंठ कापसे सुरेश पाटील प्रमोद लोकापुरे बाळासाहेब म्हेत्रे रामलिंग शेरीकर विशाल पसारे धुळप्पा बजे शिवानंद देवरमणी महेश वागदरे सिद्धराम मोघे प्रभू शोबादे शरणप्पा मुदगोड शिवाजी नाईक आणि अनिल बिडवे राजू मलंग चन्नाप्पा धरणे विश्वनाथ भास्कर आदी शेकडो स्वयंसेवकांनी निसर्गसेवा करीत असल्याने निंबाळ मठाचे मठाधीश मोन मुनी जडेय शांतलिंगेश्वर महास्वामीजी यांनी प्रसंगी त्यांचा सन्मान व सत्कार केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button