अक्कलकोटचे ग्रामदैवत मल्लिकार्जुन मंदिराचे जिर्णोद्धाराचे काम युद्ध पातळीवर सुरू ; आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पुढाकारामुळे कामाला वेग
महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ अंतर्गत चार कोटी रुपये मंजूर

अक्कलकोटचे ग्रामदैवत मल्लिकार्जुन मंदिराचे जिर्णोद्धाराचे काम युद्ध पातळीवर सुरू ; आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पुढाकारामुळे कामाला वेग

अक्कलकोट:-प्रतिनिधी)
येथील ग्रामदैवत मल्लिकार्जुन मंदिराच्या बांधकामासाठी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ अंतर्गत चार कोटी रुपये मंजूर करून आणल्याने मंदिराचे जिर्णोद्धाराचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याने शहरवासीयातून समाधान व्यक्त होत आहे.

गेल्या अडीचशे वर्षाहून अधिक काळाची इतिहास सांगणारी अक्कलकोटचे ग्रामदैवत मल्लिकार्जुन मंदिरात अक्कलकोटचे आराध्य दैवत श्री स्वामी समर्थ हे सन 1856 साली ललित पंचमीला अक्कलकोट शहरात प्रवेश केले होते त्यांनी प्रथम बस स्थानकासमोरील खंडोबा मंदिर येथे मुक्काम केले नंतर लगतच असलेल्या ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते. श्री स्वामी समर्थ हे सन 1856 ते 1878 म्हणजे 22 वर्षे अक्कलकोट शहरात वास्तव्यास होते या 22 वर्षाच्या कालावधीत वटवृक्ष देवस्थान समदे मठ गुरु मंदिर खासबाग सह तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन विविध चमत्कार करत दारिद्र्यांना दारिद्र्य मुक्त केले रोग्यांना रोगमुक्त केले होते. श्री स्वामी समर्थांचा उगम आंध्र प्रदेशातील श्रीशैलम येथे कर्दळी वनातून झाल्याचे अनेक साहित्यात ग्रंथात व बकर मध्ये उल्लेख असून श्री स्वामी समर्थांनी श्री मल्लिकार्जुनाना आपले दैवत मानत असल्यामुळे आपल्या बावीस वर्षाच्या वास्तव्य काळात दर सोमवारी न चुकता ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिरात दर्शनासाठी जात होते. अशा एका ऐतिहासिक मंदिराचे जीर्णोद्धार करण्याचे संकल्प आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी करून देवस्थान पंच कमिटीच्या सर्व सदस्यासह शहरातील नामवंत बांधवांशी सल्लामसलत करून जीर्णोद्धाराचे काम हाती घेतलेला आहे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी प्रथम मंदिराच्या सभा मंडपासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाकडून दोन कोटी रुपये निधी मंजूर करून आणले होते मात्र मंदिर समितीचे काही सदस्यांनी सभामंडपासह गर्भ मंदिर व शिखर आधी सर्वच बांधकामाचे नूतनीकरण करण्याचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यासमोर हा विषय मांडताच शासन स्तरावरून चार कोटी रुपये निधी मंजूर करून आणले आणखी निधी लागल्यास कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन आमदार कल्याणशेट्टी यांनी दिल्याने ग्रामदैवत मल्लिकार्जुन मंदिराचे जीर्णोद्धाराच्या कामाला जोमाने सुरुवात झाल्याने श्री मल्लिकार्जुन भक्त्तातून वर्गणीची ओघ मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे.
सदरील मंदिर जीर्णोद्धार कामासाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर समितीचे शिष्टमंडळ आंध्र व कर्नाटक प्रदेशातील विविध गावांना भेटी देऊन तेथे बांधण्यात आलेल्या दगडी बांधकामाचे मंदिराचे पाहणी करून अनेक कारागराची चर्चा व सल्लामसलत करून कांचीपुरम येथील बी टेक इन टेम्पल आर्ट चे चेन्नई युनिव्हर्सिटीचे पदवी प्राप्त असलेले कांचीपुरम येथील वरदराजन आरमुखम आचार्य यांच्याकडे कामाचे जबाबदारी सोपवलेले असून विजय वाडा येथील स्टील ग्रे ग्रॅनाईट या दगडातून मंदिराचे बांधकाम करण्याचे योजले असून मंदिराचे बांधकामाला सुरुवात झालेली आहे मंदिर बांधकामासाठी आज तगायात 200 टन हून अधिक दगड मागविण्यात आलेले असून 20 हून अधिक कारागिरांनी अहोरात्र दगड घडविण्याचे व नक्षीकाम करण्याचे काम माशाळे इस्टेट सोलापूर रोड येथे करण्यात येत आहे. मंदिराचे संपूर्ण बांधकाम 18 महिन्यात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट मंदिर समितीने ठेवले असून मल्लिकार्जुन मंदिराच्या बांधकाम सेवेत सहभागी होण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्वेच्छेने वर्गणी देण्याचे आव्हान मंदिर समितीच्या वतीने करण्यात आलेल्या आहे.
मंदिर बांधकामाच्या देखभालीवर देवस्थानचे अध्यक्ष शिवलिंग स्वामी नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी महेश हिंडोळे प्रशांत लोकापुरे सुनील गोरे बसवराज माशाळे शिवराज स्वामी स्वामीनाथ हिप्परगी आधी जण करीत आहेत.

चौकट:- अक्कलकोटचे ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिराच्या जिर्णोद्धरासाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी शासन स्तरावरून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्यामुळे महाराष्ट्रातच एक ऐतिहासिक मंदिर होण्याचे अक्कलकोट करांचे स्वप्न पूर्ण होत आहे गर्भ ग्रह शिखर बांधकाम सभा मंडप व सुवर्ण कळसा रोहण कार्यक्रम करण्याकामी मल्लिकार्जुन भक्तांनी सढळ हाताने मदत करावे
नगरसेवक महेश हिंडोळे अक्कलकोट

चौकट:-
श्रीशैल मल्लिकार्जुन मंदिराचे प्रतिबिंब असलेले अक्कलकोटचे ग्रामदैवत मल्लिकार्जुन मंदिराचे जिर्णोदरासाठी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी शासन स्तरावरून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्यामुळेच एक ऐतिहासिक मंदिर होत असून मल्लिकार्जुन भक्तांनी मोठ्या प्रमाणात वर्गणी देऊन सहकार्य करावे असे आव्हान समाजसेवक शिवराज स्वामी अक्कलकोट
