श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाच्या ३८ वा. वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सवाचा विविध मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन पहिल्या पुष्पाचे उद्घाटन सोहळा संपन्न
अक्कलकोट : (प्रतिनिधी)*
*श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाच्या ३८ वा. वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सवाचा शानदार शुभारंभ न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली दि. ३० जून रोजी सोमवार सायंकाळी ६.३० वा. विरक्त मठाचे श्री म.नि.प्र. पूज्य बसवलिंग महास्वामीजी, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे मुख्य पुजारी प.पू.श्री मोहन पुजारी, श्री स्वामी समर्थ समाधी मठाचे पुजारी वे.शा.सं.श्री अण्णू महाराज, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, कु. प्रथमेश इंगळे, श्री बसवराज शास्त्री तीर्थ, इंदोर (मध्यप्रदेश) चे नगरसेवक रमेश घाटे, तहसिलदार विनायक मगर, उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन पहिल्या पुष्पाचे उद्घाटन करण्यात आले.*

दरम्यान श्रींची प्रतिमा, नटराज व स्वर्गीय लतादीदी मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर थोर संगित दिग्दर्शक व गायक पद्मश्री पंडीतजी ह्रदयनाथ मंगेशकर यांच्या मार्गदर्शनाखाली राधा मंगेशकर आणि सहकारी मुंबई यांचा ‘नक्षत्रांचे देणे, कार्यक्रम सादर करण्यात आला. यांच्या समवेत केदार परांजपे, अमृता ठाकूर देसाई, ऋतुराज कोरे, विशाल गंडूतवार, अभिजित वाडेकर, सोनाली साठे यांनी साथ दिली. या सर्व कलाकारांचा न्यासाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
चौकट :
*श्रद्धांजली :-* कार्यक्रमाच्या प्रारंभी पहलगाम हल्ल्यातील शहीद सैनिक व नागरिकांसह गुजरात विमान दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

उद्घाटन सोहळ्यास उपस्थित मान्यवरांचा सत्कार अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा कृपावस्त्र देऊन सत्कार करण्यात आला. न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी व संजय कुलकर्णी यांच्या हस्ते यथासांग मंत्र पठणाने श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
राधा मंगेशकर यांच्या नक्षत्राचे देणे या कार्यक्रमात हे हिंदुशक्ती शंभु तेजा हे प्रुभो शिवाजी राजा, जय जय स्वामी समर्थ..!, सुंदर ती…!, येणार साजन माझा…!, कोरा कागज..!, आदी मराठमोळ्या गाण्या बरोबरोच हिंदी सदाबहार गाण्यांनी उपस्थित श्रोत्यांची मने जिंकली. मंडळाच्या ३८ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सवाचा शानदार शुभारंभास श्रोतेगणांची प्रचंड गर्दी झाली होती.

यावेळी न्यासाचे विश्वस्त अलकाताई जनमेजयराजे भोसले, अर्पिताराजे अमोलराजे भोसले, माजी नगराध्यक्षा अनिता खोबरे, स्वाती निकम, रत्नमाला मचाले, कु. तेजस्विनीराजे अमोलराजे भोसले, कु. स्वामिनीराजे अमोलराजे भोसले, स्मिता कदम, पल्लवी कदम, उज्वला भोसले, संगीता भोसले, रूपा पवार, स्वप्ना माने, कविता वाकडे, सुवर्णा घाडगे, राजश्री माने, क्रांती वाकडे, अनिता गडदे, धनश्री पाटील, सरोजनी मोरे, दिव्या मोरे, कल्पना मोरे, कोमल क्षीरसागर, शितल क्षीरसागर, अक्षता खोबरे, गौरी दातार, रुपाली भोसले, व न्यासाचे उपाध्यक्ष- अभय खोबरे, सचिव- शामराव मोरे, कु. हर्षवर्धनराजे अमोलराजे भोसले, विश्वस्त- भाऊ कापसे, संतोष भोसले, राजेंद्र लिंबीतोटे, प्रा. शरणप्पा आचलेर, मनोज निकम, ओंकारेश्वर उटगे, बाळासाहेब मोरे, कैलास वाडकर, प्रभाकर मजगे, मल्लिनाथ स्वामी, अँड.संतोष खोबरे, रोहित खोबरे, अरविंद शिंदे, अप्पा हंचाटे, सौरभ मोरे, अॅड. प्रणीत जाधव सोलापूर, अॅड. परवेझ कुरनुरकर, राजु नवले, शितल जाधव, निखील पाटील, बाळासाहेब कुलकर्णी बबलादकर, मैनुद्दीन कोरबू, रोहन शिर्के, प्रा. सायबण्णा जाधव, अतिश पवार, प्रवीण घाडगे, गोटू माने, बाळासाहेब घाटगे, बाळासाहेब पोळ, कुमार सलबत्ते, शहाजीबापू यादव, महादेव अनगले, सतीश महिंद्रकर, दत्ता माने, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, महांतेश स्वामी, संजय गोंडाळ, सत्तारभाई शेख, प्रसाद मोरे, वैभव मोरे, फहीम पिरजादे, केदार तोडकर, योगेश पवार, आकाश सूर्यवंशी, विनायक भोसले, भरत राजेगावकर, मल्लिकार्जुन बिराजदार, प्रशांत साठे, वासू कडबगांवकर, गोविंदराव शिंदे, प्रा. प्रकाश सुरवसे, प्रा. मनोज जगताप, ज्ञानेश्वर भोसले, सुरेश डीग्गे ठाणे, समर्थ चव्हाण, सुमित कल्याणी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, विठ्ठलराव रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण, श्रोते बहुसंख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन श्वेता हुल्ले यांनी केले. तर न्यासाचे सचिव शामराव मोरे यांनी आभार मानले.
*गुणीजन गौरव :* फारूक महमदहनीफ शेख,( आश्रम शाळा,डीग्गेवाडी), प्रशांत श्रीपतराव माने,(प्राचार्य, खोपोली), सचिन देविदास सुरवसे,(वाहक,एस.टी.महामंडळ), यांचा न्यासाच्या वतीने गुणीजन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी गुणवंत विद्यार्थी गौरव : तालुक्यातील इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेत उत्तम गुण मिळवलेल्या ५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव न्यासाच्या वतीने करण्यात आला.
मंगळवार दि. १ जुलै आज रोजी सायंकाळी ७ ते रात्रौ ९.३० पर्यंत आदेश बांदेकर प्रस्तुत ‘खेळ मांडियेला’ (खेळ, किस्से, गप्पा, साऱ्या कुटुंबासाठी) हा कार्यक्रम सादर होणार आहे.
चौकट :
*अख्या मंत्री मंडळासह विधीमंडळातील पदाधिकाऱ्याकडून शुभ संदेश -* श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाच्या ३८ वा. वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सवाच्या कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष- अॅड.ना. राहुल नार्वेकर, उपाध्यक्ष ना.अण्णा बनसोडे, विधानपरिषदेचे सभापती प्रा. ना.राम शिंदे, उपसभापती ना. नीलमताई गोऱ्हे, विरोधीपक्ष नेते ना.अंबादास दानवे, यांच्या सह राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, ना. अजित पवार यांच्या सह राज्याचे मंत्री, राज्यमंत्री यांनी शुभ संदेशाद्वारे शुभेच्छा दिले आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!