*अक्कलकोट : (प्रतिनिधी)*
*श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाचा ३८ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सव न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली होत असून, बुधवारी ‘रागा अनुरागा’ ह्या कन्नड कार्यक्रमाने तिसरे पुष्प संपन्न झाले. दरम्यान श्री गणेश वंदना..!, महादेव…!, मल्ला..!, सत्यम शिवम सुंदरम..! अशा एक ना अनेक कन्नड भावगीते, भक्तीगीत व चित्रपट गीतांनी कर्नाटकच्या ख्यातनाम गायिका अनुराधा भट, निखील, रश्मी, पार्थ, धनु यांच्या सह निवेदिका अनुश्री च्या मुक्त कंठाना कन्नड श्रोत्यांनी भरभरून सात देत मनमुराद आनंद लुटला या सदाबहार कार्यक्रमाने श्रोते भारावले होते. कन्नड रसिक श्रोत्यांनी भरभरून दिलेल्या प्रोत्साहानाने कलाकार भारावून गेले होते. टाळ्यांच्या आवाजाने परिसर दुमदुमून गेला होता. या कार्यक्रमात तालुक्यातील तोळणूर येथील अंध कलाकार रेवणसिद्ध फुलारी यांनी देखील सहभाग नोंदविला.*

प्रारंभी कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन प.पू.म.नि.प्र.डॉ.अभिनव बसवलिंग महास्वामीजी, जगदगुरु बसवलिंगेश्वर महासंस्थान, तुप्पीन मठ, नागणसूर, म.नि.प्र. बसवलिंग महास्वामीजी विरक्त मठ अक्कलकोट, मिलन कल्याणशेट्टी माजी नगरसेवक अक्कलकोट, डॉ. व्यंकटेश मेतन, सिद्धाराम पाटील, संपादक, दै.सकाळ, व्यंकटेश पटवारी,संपादक,दै.पुण्यनगरी, कन्नड साहित्य परिषदचे अध्यक्ष सोमशेखर जमशेट्टी, राजेंद हत्ते, बसवराज माशाळे, राजशेखर उंबराणीकर, प्रा.डॉ. जी.एस. धबाले सर, प्राचार्य, सी.बी.खेडगी महाविद्यालय, राजशेखर हिप्परगी, दिनेश पटेल, विठ्ठल तेली, दत्तात्रय पाटील, ओंकार कोरे, सुनंदा तेली अध्यक्षा-वीरशैव समाज महिला मंडळ, अक्कलकोट, लक्ष्मी अचलेर, वीरशैव समाज महिला मंडळ, अक्कलकोट यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी श्रींची प्रतिमा, नटराज व स्वर्गीय लतादीदी मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी लोकप्रिय कन्नड भावगीते व भक्तिगीते सादरकर्ते – कर्नाटकच्या ख्यातनाम गायिका अनुराधा भट, व प्रसिध्द निवेदिका अनुश्री आणि सहकारी बेंगळूर यांच्यासह मान्यवरांचा न्यासाच्या वतीने सत्कार करण्यात आला. न्यासाचे पुरोहित संजय कुलकर्णी व सोमकांत कुलकर्णी यांच्या हस्ते मंत्र पठणाने पूजन संपन्न झाले.
चौकट :
. श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाचा ३८ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सव न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या विविध कार्यक्रमात कर्नाटकच्या कलाकारांना संधी मिळाली हे आमचे भाग्य असून, भोसले पिता – पुत्रामुळे आम्ही आज सर्व कलाकार स्वामींच्या चरणी सेवा करायला मिळाली या बद्दल न्यासाचे ऋण व्यक्त करत असल्याचे कर्नाटकच्या ख्यातनाम गायिका अनुराधा भट, निवेदिका अनुश्री यांनी व्यक्त केले.
चौकट :
*गुणीजन गौरव :* शुभम पंजाबराव माहुरे,(सहाय्यक अभियंता), सुप्रभात ग्रुप,अक्कलकोट, अदिती अमोल कुलकर्णी,(मुख्याध्यापिका (IMS) सोलापूर), अभिजित महादेव सुरवसे, (अभियंता, कुरनूर) यांचा न्यासाच्या वतीने गुणीजन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
चौकट :
*गुणवंत विद्यार्थी गौरव :*
तालुक्यातील इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेत उत्तम गुण मिळवलेल्या ७ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव न्यासाच्या वतीने करण्यात आला.
चौकट :
दि. ३ जुलै रोजी गुरुवार सायंकाळी ७ ते रात्रौ ९.३० पर्यंत बेला शेंडे यांचे ‘संगीत रजनी’ (भावगीते, चित्रपट गीते व भक्ती गीते), हा कार्यक्रम सादर होणार आहे.
यावेळी न्यासाचे विश्वस्त अलकाताई जनमेजयराजे भोसले, अर्पिताराजे अमोलराजे भोसले, माजी नगराध्यक्षा अनिता खोबरे, स्वाती निकम, कु. तेजस्विनीराजे अमोलराजे भोसले, कु. स्वामिनीराजे अमोलराजे भोसले, स्मिता कदम, पल्लवी कदम, उज्वला भोसले, संगीता भोसले, रूपा पवार, स्वप्ना माने, कविता वाकडे, सुवर्णा घाडगे, राजश्री माने, सुनंदा अष्टगी, क्रांती वाकडे, अनिता गडदे, रोहिणी देशपांडे, धनश्री पाटील, दिव्या मोरे, कल्पना मोरे, अक्षता मोरे, कोमल क्षीरसागर, शितल क्षीरसागर, अक्षता खोबरे, रुपाली भोसले, व न्यासाचे उपाध्यक्ष- अभय खोबरे, सचिव- शामराव मोरे, कु. हर्षवर्धनराजे अमोलराजे भोसले, विश्वस्त- भाऊ कापसे, लक्ष्मण पाटील, संतोष भोसले, राजेंद्र लिंबीतोटे, मनोज निकम, बाळासाहेब कुलकर्णी बबलादकर, मैनुद्दीन कोरबू, शिवराज स्वामी, मल्लिनाथ करपे, ओंकारेश्वर उटगे, मल्लिनाथ स्वामी, अँड.संतोष खोबरे, रोहित खोबरे, अरविंद शिंदे, अप्पा हंचाटे, सौरभ मोरे, राजु नवले, शितल जाधव, अनिकेत सोनटक्के, बालाजी पाटील, निखील पाटील, रोहन शिर्के, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाहक- चेतन जाधव, प्रा. सायबण्णा जाधव, दिलीपराव महिंद्रकर, कांत झिपरे, अतिश पवार, प्रवीण घाडगे, गोटू माने, बाळासाहेब घाटगे, बाळासाहेब पोळ, कुमार सलबत्ते, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, दत्ता माने, आकाश शिंदे, यश विभूते, बीबी धनशेट्टी, प्रशांत बिराजदार, शरणप्पा फुलारी, शिवराज किलजे, प्रीतीश किलजे, बसवराज साखरे, सिद्धाराम सक्करकी, शंकरराव व्हनमाने, सिद्धराम माळी, केदार माळशेट्टी, राजू एकबोटे, मल्लिकार्जुन कोरे, विद्याधर गुरव, काशिनाथ अवताडे, अंकुश केत, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, श्रीनिवास गवंडी, लक्ष्मण बिराजदार, महांतेश स्वामी, संजय गोंडाळ, सत्तारभाई शेख, प्रसाद मोरे, वैभव मोरे, फहीम पिरजादे, केदार तोडकर, योगेश पवार, आकाश सूर्यवंशी, विनायक भोसले, भरत राजेगावकर, मल्लिकार्जुन बिराजदार, प्रा. शरणप्पा आचलेर, प्रशांत साठे, विशाल कलबुर्गी, गोविंदराव शिंदे, ज्ञानेश्वर भोसले, समर्थ चव्हाण, सुमित कल्याणी, राहुल इंडे, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, विठ्ठलराव रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण, श्रोते बहुसंख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन श्वेता हुल्ले यांनी केले तर न्यासाचे सचिव शामराव मोरे यांनी रसिकप्रेक्षकांचे स्वागत व आभार मानले. उत्कृष्ठ लाईट व्यवस्था शंभूराजे इलेक्ट्रिकल यांनी केले.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!