गावगाथा

“शिवचरित्रातून समाजप्रबोधन : प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांचे प्रभावी व्याख्यान स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वर्धापनदिनी”

वर्धापन दिनानिमित्त विशेष

*अक्कलकोट : (प्रतिनिधी)*
*महाराष्ट्राच्या मातीतून उभे राहिलेले स्वराज्याचे स्वप्न पाहणारे आणि ते साकार करणारे एक महान व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्याच कार्याचा, त्यांच्या विचाराचा आणि शौर्याचा गौरव आज ही होतोय, पुढे ही होत राहणार…! छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक राजा नव्हते तर ते एक महान व्यक्तिमत्व होते त्यांचे विचार आणि कार्य आपल्याला कायमच प्रेरणा देत राहील, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे संकल्पित कार्य स्वराज्याच्या हितार्थ केले, आजच्या पिढीने शिवरायांचे विचार अंगीकारणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन ख्यातनाम व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांनी केले.*
ते श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाच्या ३८ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सवनिमित्त न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली होत असून, शुक्रवारी ख्यातनाम व्याख्याते प्रा.नितीन बानुगडे-पाटील यांचे ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर व्याख्यानाने ५ वे पुष्प संपन्न झाले.
दरम्यान कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन राज्याचे माजी शिक्षण मंत्री आमदार दिपक केसरकर, राज्य आर.पी.आय. (आठवले गट) सचिव- राजाभाऊ सरवदे, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष- महेश इंगळे, श्री व सौ. चंद्रशेखर विनायक मंत्री, झोनल मॅनेजर, बँक ऑफ इंडिया सोलापूर, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अक्कलकोट तालुका अध्यक्ष- दिलीपभाऊ सिद्धे, श्री. व सौ. संजय कुलकर्णी (जीएसटी विभाग), सुरेश सुर्यवंशी, बाबासाहेब निंबाळकर, बाळासाहेब मोरे, गोव्याचे पोलीस निरीक्षक लक्सी अमोणकर, झिला पेडणेकर, अनंत मालवणकर, गुरुराज नाडगोडा, आर.पी.आय. (आठवले गट) तालुका अध्यक्ष- अविनाश मडीखांबे, सन्नी ठेंगील, गोगावचे सरपंच वनिता सुरवसे, समीर लोंढे, नागेश भिसे, नवाज भाई, नागेश बिद्री यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान श्रींची प्रतिमा, नटराज व स्वर्गीय लतादीदी मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिलेले राज्याचे माजी शिक्षण मंत्री आमदार दिपक केसरकर यांचा सत्कार न्यासाच्या वतीने करण्यात आला.
पुढे बोलताना प्रा.बानुगडे-पाटील यांनी म्हणाले की, जगभरात शिवरायांचा आदर्श घेतला जातो. नेताजी सुभाषचंद्र बोस हे तुरुंगात असताना शिवचरित्राचे वाचनाच्या प्रभावाने त्यांनी वेषांतर करून तुरुंगातून बाहेर येऊन आझाद हिंद सेनेची स्थापना केली, छत्रपती शिवरायांचा महामंत्र घेऊन त्यांनी देशासाठी लढले असे सांगून, प्रा. बानुगडे- पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण, शिक्षण स्वराज्याची स्थापना, प्रेरणा देणारे कार्य, एक महान देशभक्त, कुशल प्रशासक, अंतरराष्ट्रीय कीर्तीचे सरसेनापती, या बाबत प्रा. बानुगडे- पाटील यांनी अंगावर शहारे उभे करणारे शिवरायांचा इतिहास सांगून उपस्थित श्रोते गणांना प्रा.बानुगडे-पाटील यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. शिवचरित्र अत्यंत सुंदर शब्दात मांडले. युवकांनी प्रचंड गर्दी केलेली होती.
याप्रसंगी प्रसिद्ध व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांच्यासह मान्यवरांचा न्यासाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा कृपावस्त्र देऊन सत्कार करण्यात आला. न्यासाचे पुरोहित सोमकांत व संजय कुलकर्णी यांच्या हस्ते मंत्र पठणाने पूजन संपन्न झाले.
चौकट :
*अन्नछत्र हे संवेदनशीलतेचे प्रतिबिंब :*
अन्नदान हे श्रेष्ठ दान असून, तीर्थक्षेत्र अक्कलकोटात स्वामी भक्तासाठी जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांनी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ स्थापन करून, एक मातृत्व संस्था म्हणून त्यांनी या संस्थेच्या माध्यमातून धार्मिक कार्याबरोबरच समाज उपयोगी कार्य त्यांच्या हातून घडत आहे. अन्नछत्र हे संवेदनशीलतेचे प्रतिबिंब आहे.
आमदार दिपक केसरकर
माजी मंत्री
चौकट:
*सार्थ अभिमान:-*
श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाच्या ३८ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सवनिमित्त न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली होत असून, माझ्यासारख्या वक्त्याला वेळोवेळी संधी देऊन समाज प्रबोधन करीत आहे याचा सार्थ अभिमान आहे.
व्याख्याते प्रा.नितीन बानुगडे-पाटील
चौकट :
*गुणीजन गौरव :* विश्वनाथ गुरप्पा देवरमनी जि.प.प्राथमिक शाळा, नागणसूर (कृषी), महेश रामराव घुटे, वरिष्ठ शाखा प्रबंधक, बँक ऑफ इंडिया, शाखा- अक्कलकोट(बँकिंग), रमेश शिवराया पुजारी, प्रयोगशाळा परिचर, सी.बी.खेडगी महाविद्यलय, अक्कलकोट, सखुबाई शिवाजी चुंगीकर, सेवेकरी, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ यांचा न्यासाच्या वतीने गुणीजन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
चौकट :
*गुणवंत विद्यार्थी गौरव :*
तालुक्यातील इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेत व पदवी परीक्षेत उत्तम गुण मिळवलेल्या ६ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव न्यासाच्या वतीने करण्यात आला.
चौकट :
दि. ५ जुलै रोजी शनिवार सायंकाळी ७ ते रात्रौ ९.३० पर्यंत ‘किर्तन’ राष्ट्रीय किर्तनकार व समाज प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख, इंदोरीकर (संगमनेर, अकोलेकर) यांचा कार्यक्रम होणार आहे.
यावेळी न्यासाचे विश्वस्त अलकाताई जनमेजयराजे भोसले, अर्पिताराजे अमोलराजे भोसले, माजी नगराध्यक्षा अनिता खोबरे, स्वाती निकम, कु. तेजस्विनीराजे अमोलराजे भोसले, कु. स्वामिनीराजे अमोलराजे भोसले, स्मिता कदम, पल्लवी कदम, उज्वला भोसले, संगीता भोसले, रूपा पवार, स्वप्ना माने, कविता वाकडे, सुवर्णा घाडगे, राजश्री माने, सुनंदा अष्टगी, क्रांती वाकडे, अनिता गडदे, रोहिणी देशपांडे, धनश्री पाटील, दिव्या मोरे, कल्पना मोरे, अक्षता मोरे, कोमल क्षीरसागर, शितल क्षीरसागर, अक्षता खोबरे, रुपाली भोसले, व न्यासाचे उपाध्यक्ष- अभय खोबरे, सचिव- शामराव मोरे, कु. हर्षवर्धनराजे अमोलराजे भोसले, विश्वस्त- लक्ष्मण पाटील, लाला राठोड, संतोष भोसले, राजेंद्र लिंबीतोटे, मनोज निकम, बाळासाहेब कुलकर्णी बबलादकर, मैनुद्दीन कोरबू, अश्पाक काझी, शरणप्पा पुजारी, स्वामिनाथ गुरव, ओंकारेश्वर उटगे, प्रभाकर मजगे, अँड.संतोष खोबरे, रोहित खोबरे, अरविंद शिंदे, अप्पा हंचाटे, सौरभ मोरे, बसवराज माशाळे, राजु नवले, शितल जाधव, चंद्रकांत सोनटक्के, बालाजी पाटील, निखील पाटील, अप्पू कलबुर्गी, विलास राठोड, माणिक बिराजदार, मोहनराव चव्हाण, प्रा.भीमराव साठे, संतोष जाधव, धनंजय गडदे, अशोकराव मलगोंडा, आकाश शिंदे, अंकुश चौगुले, शिवा मंगरुळे, रोहन शिर्के, सागर गोंडाळ, प्रा. सायबण्णा जाधव, अतिश पवार, प्रवीण घाडगे, गोटू माने, आकाश गंगणे, बाळासाहेब घाटगे, बाळासाहेब पोळ, दहिटणे सरपंच- नितीन मोरे, आकाश गडकरी, कुमार सलबत्ते, लक्ष्मण विभूते, अक्षय मोरे, शहाजीबापू यादव, कुमार पाटील, सतीश महिंद्रकर, दत्ता माने, आकाश शिंदे, यश विभूते, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, श्रीनिवास गवंडी, लक्ष्मण बिराजदार, महांतेश स्वामी, संजय गोंडाळ, प्रसाद मोरे, वैभव मोरे, फहीम पिरजादे, केदार तोडकर, योगेश पवार, आकाश सूर्यवंशी, विनायक भोसले, भरत राजेगावकर, मल्लिकार्जुन बिराजदार, प्रा. शरणप्पा आचलेर, प्रशांत साठे, गोविंदराव शिंदे, ज्ञानेश्वर भोसले, समर्थ चव्हाण, सुमित कल्याणी, राहुल इंडे, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, विठ्ठलराव रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण, श्रोते बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी अविनाश मडीखांबे यांच्या वाढदिवसानिमित्त न्यासाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन श्वेता हुल्ले यांनी केले तर न्यासाचे सचिव शामराव मोरे यांनी रसिकप्रेक्षकांचे स्वागत व आभार मानले. उत्कृष्ठ लाईट व्यवस्था शंभूराजे इलेक्ट्रिकल व मंडप सजावट कल्लप्पा छकडे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button