गावगाथा

गेल्या विस वर्षांपासून जिभेवर रेंगाळणारी एकच चव : जेऊरचा ‘धानेश्वरी’ अर्थात महादेवचा ‘ पेढा

ग्रामीण खाद्य पदार्थ

गेल्या विस वर्षांपासून जिभेवर रेंगाळणारी एकच चव : जेऊरचा ‘धानेश्वरी’ अर्थात महादेवचा ‘ पेढा

HTML img Tag Simply Easy Learning    
अक्कलकोट पासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या व दक्षिण काशी म्हणून संबोधील्या गेलेले श्रीक्षेत्र स्वयंभू श्री काशिविश्वेश्वरचे पवित्र स्थान असलेल्या जेऊर ता.अक्कलकोट येथील महादेव इरशेट्टी यांनी बनवीत असलेल्या निर्भेळ व चवदार पेढ्यांची निर्मिती आणि हातोहात रोजच्या रोज होणारी सर्व पेढ्यांची विक्री हेच हॉटेल ‘धानेश्वरी’ च्या यशाचे रहस्य असल्याचे त्याच्या दर्जेदार व सतत जिभेवर रेंगाळणाऱ्या चवीमुळे सिद्ध झाले आहे.जेऊर येथे ‘ धानेश्वरी’ या नावाने गेल्या विस वर्षांपासून प्रसिद्ध असलेले पेढे हे त्याच्या आगळ्यावेगळ्या चवीने आणि उत्तम दर्जाचे चव असल्याने पंचक्रोशीतील सर्व नागरिकांच्या जिभेवर सतत त्याचे नाव येत असते.दुधाचे पदार्थ ज्यात सतत भेसळ होत असल्याचे दिसते आणि त्यासाठी हलक्या दर्जाचा 150 ते 200 रुपयांचा क्रीमचा खवा वापरून नागरिकांच्या जीवाशी खेळला जातो अशी चर्चा सतत होत असतें.त्यातच पेढे म्हंटले की शुद्धता ही अत्यावश्यक आहे आणि जेऊरच्या महादेव इरशेट्टी यांनी नेमकी हीच बाब लक्षात घेऊन आज ना उद्या आपले वेगळे ब्रँड तयार होईल हे ध्येय ठेऊन ग्रामीण भागात वाड्या वस्त्यांवर शेतकरी बांधवांकडून मिळणारे निर्भेळ आणि चवदार दूध गोळा करून त्यापासून पेढा बनविण्यासाठी असलेली शास्त्रशुद्ध पद्धत शिकुन गेल्या विस वर्षापासून एकच चव आणि तोच दर्जा ठेवल्याने त्याची प्रसिद्धी आणि खप हे दिवसेंदिवस वाढतच आहे.ग्रामीण भागात पन्नास रुपयात एक लिटर चांगले म्हशीचे दूध उपलब्ध होते ते एकदिवसाआड 30 ते 40 लिटर इतकं दूध एकत्र करून पेढा बनविले जाते.आणि हे सर्व पेढे उत्तम चवीमुळे चोवीस तासात हातोहात संपतो देखील.दररोज सकाळी चार तास आपली पत्नी निर्मला यांच्या सहकार्याने पेढा बनविण्याची प्रक्रिया पूर्ण करणे त्यानंतर तीन तास ते बांधून घेणे हा नित्यक्रम ठरलेला आहे.त्यांची पेढे बनविणे आणि सर्वच पेढे समान मापाची वजन न करता बनविणे ही तर त्यांची खासीयत आहे.अगदी आवश्यक तेवढीच साखर,योग्य प्रक्रिया आणि वेगळेपण यामुळे प्रत्येक जण हवे तेवढे खाऊन सोबत पुन्हा घेऊन जाणे हा तर दिनक्रमचं आहे.जेऊरचा निर्भेळ पेढा आता जेऊर गाव त्यात भरणारा शनिवारचा बाजार तसेंच अक्कलकोट सोलापूर,तडवळ,पानमंगरूळ, करजगी,हंद्राळ, इंगळगी,गौडगाव तसेच हंजगी आदी भागात प्रसिद्ध आहे.एकदा चव चाखलेला ग्राहक पुन्हा पुन्हा येतच असतो आणि त्यामुळे ग्राहक संख्या ही सतत वाढतच असते.गेल्या सोळा वर्षांपासून पेढे निर्मित करीत आहे.गुणवत्ता व दर्जा याबाबत कधीच तडजोड केली नाही.भेसळ करून नागरिकांना आरोग्य दृष्टया अडचणीचे ठरेल असे कधीच केले नाही.त्यामुळे आता आमचा निर्भेळ पेढा दिवसेंदिवस प्रसिद्ध होऊन खवय्यांच्या कसोटीस पात्र ठरले आहे अशी प्रतिक्रिया हॉटेलचे मालक महादेव इरशेट्टी यांनी दिली आहे.
सौजन्य — राजशेखर चौधरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button