मोठी बातमी..! शिक्षकांच्या खात्यात 20 टक्के वाढीव पगार जमा होणार ; शिक्षकांच्या आंदोलनाला यश
मुंबई (प्रतिनिधी ): आझाद मैदानावरील शिक्षकांच्या आंदोलनाला मोठा यश मिळाला आहे . विधिमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर विनाअनुदानित शिक्षकांच्या खात्यात 20 टक्के वाढीव पगार जमा होईल, असं आश्वासन सरकारनं दिलं आहे.

अधिवेशन संपताच शिक्षकांच्या खात्यावर पैसे
गिरीश महाजन म्हणाले की, 18 तारखेला पावसाळी अधिवेशन संपेल. त्यावेळी तुमच्या खात्यात 20 टक्के वाढीव पगार जमा झालेला असेल. मुख्यमंत्री हे शिक्षकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहेत.


यापुढे पगाराची तारीख टळणार नाही
गिरीश महाजन म्हणाले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिक्षकांसबंधी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मात्र थोड्या आर्थिक अडचणींमुळे मधल्या काही काळातील हफ्ते देण्यास उशीर झाला. मी तुम्हाला सांगतो की तुम्ही कुणावरही विश्वास ठेऊ नका, तुमचे काम आम्हीच करणार आहोत. पुरवणी मागण्यांमधे आज मांडता आले नाही, मात्र इथून पुढे पगाराची तारीख टळणार नाही. इथून पुढे हा पगार नियमितपणे तुमच्या खात्यात जमा होईल.”
