HTML img Tag
📰 छावा संघटनेच्या मागणीला यश – पुस्तक वाटपास सुरुवात
बार्शी (प्रतिनिधी) – छावा संघटनेच्या वतीने दिनांक १० जुलै रोजी करण्यात येणाऱ्या नियोजित आंदोलनाची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यानुसार आजपासून गटशिक्षणाधिकारी बालाजी नाटके व त्यांच्या सहकाऱ्यांनी शाळांमध्ये पाठ्यपुस्तकांचे वितरण सुरू केले आहे.
छावा संघटनेने वेळेवर विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याची जोरदार मागणी केली होती. या मागणीच्या पार्श्वभूमीवर बार्शी तालुक्यात कमी-अधिक असलेल्या पुस्तकांचे समायोजन केंद्रप्रमुख श्री. सिद्धेश्वर तिकटे (केंद्र – कोरफळे) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. उर्वरित पुस्तके येत्या ४ ते ५ दिवसांत वितरित करण्यात येतील, असे आश्वासनही गटशिक्षणाधिकारी यांनी दिले आहे.
दरम्यान, छावा संघटनेने दहा तारखेला होणारे आंदोलन पुढे ढकलून आता १६ जुलै रोजी ठेवले आहे. जर त्या वेळीही पुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली नसतील, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!