कोंढवा खुर्द येथील शाळेत CCTV दुरुस्ती, डिस्प्ले व बेंचेससाठी प्रशासनाकडे मागणी
कोंढवा खुर्द येथील श्री संत गाडगे महाराज प्रा. विद्यालय, शाळा क्रमांक ५ मधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले काही मुद्दे सध्या चर्चेत आहेत. शाळेच्या परिसरात असलेली CCTV यंत्रणा अकार्यक्षम झाली होती, ऑफिसमध्ये माहिती प्रसारणासाठी आवश्यक डिस्प्लेची कमतरता जाणवत होती, तसेच विद्यार्थ्यांना पुरेशा संख्येने बसण्यासाठी बेंचेस उपलब्ध नव्हत्या.
या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते प्रसाद बाबर यांनी पुढाकार घेत, मुख्याध्यापकांच्या समवेत पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाशी पत्रव्यवहार केला. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी CCTV यंत्रणा दुरुस्त करून पुन्हा कार्यान्वित करावी, शाळेच्या कार्यालयात डिस्प्ले बसवावा व आवश्यक बेंचेस त्वरित उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या मागण्यांची गांभीर्याने दखल घेतली असून लवकरच आवश्यक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वातावरण सुरक्षित व सुसज्ज राहावे यासाठी संबंधित यंत्रणांशी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता, ही मागणी केवळ सुविधा म्हणून नव्हे तर त्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी एक आवश्यक पाऊल मानले जात आहे.
“विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत,” असे प्रसाद बाबर यांनी सांगितले.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!