हरवलेली रक्कम व मोबाईल प्रामाणिकपणे परत केला; उमरगा बसस्थानकावरील वहातूक नियंत्रक अतुल बारभाई यांची प्रशंसनीय कृती
प्रामाणिकपणा


हरवलेली रक्कम व मोबाईल प्रामाणिकपणे परत केला; उमरगा बसस्थानकावरील वहातूक नियंत्रक अतुल बारभाई यांची प्रशंसनीय कृती
प्रतिनिधी, उमरगा
उमरगा एस.टी. बस स्थानकावर तब्बल ३१ हजार रुपये रोख व मोबाईल हरवलेल्या प्रवाशाची वस्तू प्रामाणिकपणे परत केल्याने वहातूक नियंत्रक अतुल बारभाई यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बुधवारी (दि. १६ जुलै) दुपारी एकच्या सुमारास कदमपूर येथील एक प्रवासी स्थानकावर विश्रांती घेत असताना त्यांच्याकडील रोख रक्कम व मोबाईल हरवले. ही बाब वहातूक नियंत्रक अतुल बारभाई यांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ वरिष्ठांना माहिती दिली व मोबाईलच्या आधारे प्रवाशाच्या कुटुंबीयांचा शोध सुरू केला.

काही वेळातच प्रवाश्याशी संपर्क होऊन स्थानकप्रमुख मुळे यांच्या उपस्थितीत रक्कम व मोबाईल त्यांच्या ताब्यात देण्यात आले. हरवलेली मौल्यवान वस्तू परत मिळाल्याने संबंधित प्रवाशाने समाधान व्यक्त करत बारभाई यांचे मन:पूर्वक आभार मानले.

प्रामाणिकपणाचा हा आदर्श उमरगा स्थानकातील कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा समाजासमोर ठेवला आहे. या उदाहरणाचे नागरिकांसह एस.टी. विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही भरभरून कौतुक केले जात आहे.
