गावगाथा

अक्कलकोटमध्ये मराठा समाजाच्या मोर्च्याला मोठा प्रतिसाद.विविध नेत्यांनी व्यक्त केला तीव्र निषेध…

ज्या चौकात प्रवीण गायकवाड यांच्याव हल्ला झाला, त्याच चौकात त्यांचा भव्य नागरी सत्कार करून विचारांचा विजय साजरा केला जाईल

अक्कलकोटमध्ये मराठा समाजाच्या मोर्च्याला मोठा प्रतिसाद.विविध नेत्यांनी व्यक्त केला तीव्र निषेध…
अक्कलकोट,*(प्रतिनिधी) संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट मध्ये झालेला जीवघेणा भ्याड हल्ला हा पुरोगामी विचारांवर झालेला प्रतिगामी हल्ला असून, बहुजन समाज आणि सकल मराठा समाज हा हल्ला कदापिही खपवून घेणार नाही. या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी अक्कलकोट कडकडीत बंद व निघालेल्या विराट मोर्च्यात सोलापूर जिल्हा तसेच शहरातील बहुजन चळवळीतील सर्व संघटना आणि नेते मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते. दरम्यान याप्रकरणी जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले आणि अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्यावर कांही जणांनी जाणूनबुजून बदनामीचे षडयंत्र सुरू केलेले होते. मात्र या प्रकरणाची खरी माहिती प्रवीण गायकवाड यांना देण्यात आलेली असल्याने त्यावर पडदा देखील पडलेल्याचे उपस्थित समाज बांधव व संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या मनोगतातून सांगितले. या निषेध मोर्चा व सभेस ५० सामाजिक संघटना, पक्ष यांनी पाठींबा दर्शविला होता. अक्कलकोट व्यापारी असोसिएयने, शाळा, महाविद्यालय उस्फुर्त सहभाग नोंदविला.*
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज चौक (बसस्थानक) जवळील श्री खंडोबा मंदिर येथे सोलापूर जिल्हा शहर व अक्कलकोट तालुक्यातील बहुजन चळवळीतील सर्व संघटना आणि नेते उपस्थित होते. विराट संख्येने खंडोबा मंदिर येथून निघालेला निषेध मोर्चा महर्षी वाल्मिकी मार्गे, विजय चौक, तारामाता चौक, कारंजा चौक, मेन रोड, तूप चौक (वीर सावरकर चौक), अॅड.सर्जेराव जाधव पथ, सोन्यामारुती चौक, समर्थ चौक, राजे फत्तेसिंह चौक मार्गे नेहरू गल्ली, श्रीमंत कांतामतीराजे विजयसिंहराजे भोसले मार्ग तेथून श्री कमला राजे चौक येथे निषेध मोर्च्याचे विराट सभेत रुपांतर झाले. सभास्थळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.
त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित दादा पवार गटाचे तालुका अध्यक्ष दिलीपभाऊ सिद्धे, कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील, भा.री.प. चे जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे, तालुका आर.पी.आय. अध्यक्ष अविनाश मडीखांबे, दहिटणे गावचे उपसरपंच विकीबाबा चौधरी यांनी हा केवळ हल्ला एका व्यक्तीवरचा नव्हे तर संपूर्ण पुरोगामी चळवळीवरचा आहे. या हल्ल्याची नोंद संपूर्ण महाराष्ट्राने घ्यावी, अशा पद्धतीने अक्कलकोट बंदचे नियोजन करण्यात आले आहे. निषेध मोर्चा व बंद यशस्वी झाल्याचे सांगून प्रशासनावर टीकास्त्र सोडले.
पुढे बोलताना अॅड. नदीम डोणगावकर, संभाजी ब्रिगेड महिला आघाडीचे जिल्हा अध्यक्ष निलम दास, लहूजी शक्ती संघटनेचे वसंतराव देडे, प्रहार संघटना जिल्हा संपर्क प्रमुख जमीर शेख, संभाजी आरमारचे श्रीकांत डांगे यांनी प्रवीण गायकवाड यांच्या वरील भ्याड हल्याचा निषेध करून प्रवीण गायकवाड यांनी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून करत असलेल्या कार्याची माहिती देऊन या घटनेतील आरोपींना कडक शासन होण्याची मागणी केली. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी प्रवीण गायकवाड यांच्यावरील जो भ्याड हल्ला झाला, त्या काळातील विस्तृत माहिती दिली. ज्या ठिकाणी घटना घडली, त्याच ठिकाणी आज सभा होत आहे. या सभास्थळीच प्रवीण गायकवाड यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. असे यावेळी सांगितले. पुढे बोलताना शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा अध्यक्ष अमोल बापू शिंदे यांनी प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्याचा निषेध व्यक्त करून प्रवीण गायकवाड यांच्या कार्याची माहिती दिली. व ज्यांनी गायकवाड यांच्यावर हल्ला व कट कारस्थान रचले यांच्यावर आपल्या भाषणाच्या माध्यमातून ताशेरे ओढले. मराठा समन्वयक माऊली पवार, राजन जाधव यांनी प्रवीण गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्याचा तीव्र निषेध करीत पोलीस प्रशासनावर टीकास्त्र सोडले. आणि याप्रकरणी दानशूर जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले आणि दानशूर अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्यावर कांही जणांनी बदनामीचे षडयंत्र सुरू केलेले होते. मात्र या प्रकरणाची खरी माहिती प्रवीण गायकवाड यांना देण्यात आलेली असल्याने त्यावर पडदा देखील पडलेल्याचे यावेळी उभयत्यांनी सांगितले. जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अश्पाक भाई बळोरगी यांनी घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून, पोलीस प्रशासन हे जनेतेचे रक्षक नसून भक्षक बनले असल्याचे आरोप करून प्रशासनावर खरमरीत टीका केली.
या प्रसंगी डॉ. सुवर्णा मलगोंडा, सोलापूरातील मराठा समाजाचे नेते दिलीप भाऊ कोल्हे, नाना काळे, राम गायकवाड, तात्या वाघमोडे, सोमा राऊत, अॅड. गणेश कदम, शाम कदम, प्रताप चव्हाण, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजीराव भोसले, शहर अध्यक्ष शिरीष जगदाळे, निशांत कवडे, मनीषा कोळी, दिलीपराव निंबाळकर, अरविंदराव शेळके, शिवाजी चापले यांच्यासह जेष्ठ समाज सेवक सुरेशचंद्र सूर्यवंशी, श्री फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रल्हाद जाधव, बाळासाहेब मोरे, संतोष फुटाणे, अमर शिंदे, सुधाकर गोंडाळ, अमोल पाटील, बाबासाहेब निंबाळकर, शामराव मोरे, अभय खोबरे, पद्माकर डीग्गे, संतोष भोसले, प्रा.प्रकाश सुरवसे, मनोज निकम, उ.बा.ठा. तालुका प्रमुख आनंद बुक्कानवरे, विलासराव सुरवसे, अकिल बागवान, मतीनभाई पटेल, बंद्देनावज कोरबू, केरबा होटकर, शीतल जाधव, प्रवीण देशमुख, दहिटणे सरपंच नितीन मोरे, महादेव अनगले, युवराज लोणारी, मनोज गंगणे, कुपेंद्र ढाले, सुनील खवळे, राजू पाटोळे, नागू ऐवळे, सुरेश कदम, दयानंद काजळे, अरुण जाधव, अतुल जाधव, लाला राठोड, विलासराव राठोड, चंद्रकांत सोनटक्के, तम्मा शेळके, संदीप फुगे पाटील, संजय गोंडाळ, सागर गोंडाळ, वैभव नवले, राजू माकणे, सौरभ मोरे, गोविंदराव शिंदे, प्रवीण घाडगे, वरूण शेळके, प्रसन्न हत्ते, विजय माने, बाळासाहेब पोळ, निखील पाटील, अतिश पवार, अतिश कटारे, अंकुश चौगुले, सनी सोनटक्के, अशोक जाधव, शिंदे गटाचे शहर प्रमुख योगेश पवार, वैभव मोरे, विशाल कलबुर्गी, महेश पाटील, सत्तार शेख, सोमशेखर जमशेट्टी, महेश दणके, लक्ष्मण मचाले, मंगेश जाधव, अजय जाधव, मंगेश सूर्यवंशी, प्रसाद मोरे, गणेश पाटील, जोतीबा पारखे, मुन्ना राठोड, बाळासाहेब कुलकर्णी देसाई, सर्फराज शेख, मुबारक कोरबू, शरणप्पा अचलेर, राजेंद्र लिंबीतोटे, कांत झिपरे, योगेश कबाडे, बाबा घंटे, जितेंद्र यारोळे, गणेश होटकर, मैनुद्दीन कोरबू, अलीबाशा अत्तार, इसुप पटेल, अतिक अरब, अश्पाक शहर काझी, बरगली गुड्डे, सद्दाम शेरीकर, अमीन मुजावर, सागर याळवार, शिवा मंगरुळे, पिंटू दोडमनी, श्रीशैल शाली, शाकीर पटेल, धानप्पा कामाटी, श्रीनिवास सोनटक्के, मल्लिनाथ पाटील, मतीन बागवान, शिवानंद फुलारी, स्वामिनाथ गुरव, गिरीश गवळी, पिंटू साठे, तुकाराम धोत्रे, लक्ष्मण झंपले, वासू कडबगांवकर, आकाश शिंदे, मल्लिनाथ नंदिकोले, फहीम पिरजादे, योगेश पवार, लक्ष्मण विभूते, उत्तम इंगळे, सुमित कल्याणी, ऋषी लोणारी, अतिक अरब, रइस टीनवाला, संजय देशमुख, दत्ता माडकर, दत्ता माने, तानाजी पाटील, रमेश हेगडे, राजू पवार, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, अनिल बिराजदार, रुद्रय्या स्वामी, शिव स्वामी, महांतेश स्वामी, धनंजय निंबाळकर, विशाल घाटगे, समर्थ चव्हाण, विठ्ठल रेड्डी यांच्यासह विविध पक्ष, सामाजिक संघटना व अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते व पाठींबा पत्र दिले.
या बंदमध्ये शाळा, महाविद्यालये, दुकाने व अन्य व्यवहार बंद होती, दवाखाने आणि मेडिकलसारख्या अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आली होती. बाहेरून येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये आणि स्थानिक जनतेला अडचण होऊ नये म्हणून बंद फक्त दुपारी २ वाजेपर्यंत असला तरी तो पूर्णतः कडकडीत होता.
प्रस्थाविक, सूत्रसंचालन व आभार: श्री फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे संचालक बाळासाहेब मोरे यांनी मानले.
या प्रसंगी तहसीलदार विनायक मगर यांना उपस्थित पदाधिकार्यांनी निवेदन सदर केले. या मोर्चा व सभास्थळी नसरोद्दीन मालीनमली यांनी पाणी बॉटलचे वाटप केले.
चौकट :-
*त्याच चौकात सन्मान करणार*
ज्या चौकात प्रवीण गायकवाड यांच्याव हल्ला झाला, त्याच चौकात त्यांचा भव्य नागरी सत्कार करून विचारांचा विजय साजरा केला जाईल, विचारांची लढाई ही विचारांनीच लढली पाहिजे, असा संदेश देत त्यांनी हा हल्ला संपूर्ण बहुजन चळवळीवर आहे, असे सांगत एकतेचा निर्धार या सभेत करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button