गावगाथा

कल्याणशेट्टी शिक्षण संकुलात “लो. टिळक व अण्णाभाऊ साठे” ना अभिवादन —-

दिनविशेष

कल्याणशेट्टी शिक्षण संकुलात “लो. टिळक व अण्णाभाऊ साठे” ना अभिवादन —-
———————————-
अक्कलकोट: महर्षि विवेकानंद समाजकल्याण संस्था अक्कलकोट संचलित सौ सुरेखा कल्याणशेट्टी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, गिरीजामाता प्राथमिक मराठी व सेमी इंग्रजी विद्यालय, मातोश्री गुरुबसवा कल्याणशेट्टी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अक्कलकोट यांच्यावतीने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी तसेच लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे जेष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव मल्लिकार्जुन मसुती, प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी, दिगंबर जगताप व पर्यवेक्षक सूर्यकांत रुगे उपस्थित होते.
स्वातंत्र्य चळवळीच्या ज्वाला भारतीयांच्या मनात – मनात चेतवणारे अग्रगण्य नेते, स्वदेशी चे पुरस्कर्ते व समाजातील अनेक वाईट कुप्रथेविषयी कडाडून विरोध करुन लोकजागृती करणारे जहालमतवादी, प्रखर राष्ट्रवादी  लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व अन्याय, अत्याचार, शोषण करणाऱ्या जुलमी प्रस्थापितांविरुध्द बंड करून आपल्या शाहीरी, पोवाडे च्या माध्यमातून जनजागृती करणारे थोर समाजसुधारक, साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती निमित्त विद्यार्थ्यांनी भाषणे केली. याशिवाय लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे जीवन परिचय इ.५ वी ते १० वी विद्यार्थ्यांना डिजिटल क्लासरूम मध्ये चित्रपट प्रदर्शित करून दाखविण्यात आले.
यावेळी  राजकुमार गवळी, सिद्धाराम पाटील, बाबुशा मंगरूळे, श्रीदेवी मायनाळे, निशिगंधा सोमेश्वर, विद्या बिराजदार, शरणबसप्पा चानकोटे आदी शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.कल्पना स्वामी यांनी केले तर सर्व उपस्थितांचे आभार मनिषा सुरवसे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button