हन्नूर येथील अनंत चैतन्य प्रशालेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना अभिवादन —–
—————————————-
सार्वजनिक उत्सवातून सामाजिक एकात्मतेची जाणीव करून देणारे थोर स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व प्रभावी लेखणीतून व अनमोल वाणीतून वंचितांच्या व्यथा मांडणारे थोर साहित्यिक व समाज प्रबोधनकार अण्णाभाऊ भाऊ साठे यांची जयंती आज महर्षि विवेकानंद समाजकल्याण संस्था अक्कलकोट संचलित अनंत चैतन्य माध्य. व उच्च माध्यमिक प्रशाला, हन्नूर येथे साजरी करण्यात आली.प्रारंभी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. अशोक साखरे व पर्यवेक्षक श्री. ज्ञानदेव शिंदे यांच्या हस्ते या दोनही महापुरुषांच्या प्रतिमेचे पुजन व पुष्पार्पण करुन अभिवादन करण्यात आले. यानंतर प्रशालेच्या कु. सोनाली तळवार, शुभांगी बाळशंकर, वैदेही पवार, मानसी तळवार व शिवानी बाळशंकर या विद्यार्थिनींची भाषणे झाली.यावेळी या दोन्ही महापुरुषांच्या जीवनकार्यावरती प्रशालेचे जेष्ठ शिक्षक श्री. शहाजी माने यांनी प्रकाश टाकला.या अभिवादन कार्यक्रमास प्रशालेचे जेष्ठ शिक्षक सरदार मत्तेखाने, सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख अप्पासाहेब काळे,धनंजय जोजन, अब्दुल अझीझ मुल्ला,प्रा.काशीनाथ पाटील, शिक्षिका मृदुलादेवी स्वामी, सेवक विश्वनाथ सैदे व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. स्वप्नाली जमदाडे मॅडम यांनी केले तर आभार सौ. मल्लमा चपळगाव मॅडम यांनी मानले.प्रशालेतील या उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व आमदार मा. श्री. सचिनदादा कल्याणशेट्टी, संस्थेचे जेष्ठ संचालक व मार्गदर्शक श्री. मल्लिनाथ कल्याणशेट्टी, प्रशालेचे माजी प्राचार्य व आधारस्तंभ श्री. सिद्धेश्वर कल्याणशेट्टी, संचालिका सौ. शांभवीताई कल्याणशेट्टी, उपसरपंच व युवा नेते श्री. सागरदादा कल्याणशेट्टी, संचालक श्री. मल्लिकार्जुन मसुती, सी. ई. ओ. सौ. रुपाली शहा, विज्ञान विभाग प्रमुख सौ. पुनम कोकळगी यांनी समाधान व्यक्त केले.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!