श्री वेंकटेश्वर देवस्थान {बालाजी} मंदिराचा उत्सव मोठ्या उत्साहाने व भक्तीभावाने संपन्न.
उत्सवात समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा व विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या समाज बांधवांचा सन्मान
पालखी सोहळा व महाप्रसादाने उत्सवाची सांगता.
(श्रीशैल गवंडी, ०१/०८/२०२५.अ.कोट.)
येथील नामधारी क्षत्रिय गवंडी समाज अक्कलकोटच्या वतीने शहरातील बुधवार पेठ येथील गवंडी समाजाच्या
श्री वेंकटेश्वर देवस्थानच्या ८४ व्या वर्धापन दिनानिमित्त श्रींचा उत्सव मोठ्या श्रद्धेने व भक्तिभावाने साजरा करण्यात आला. आज श्रावण शु.अष्टमी उत्सवरोजी पहाटे ५ वाजता पारंपरिक पद्धतीने देवस्थानचे पुजारी पवन देसाई यांनी काकडआरती केली. सकाळी ६ ते ७ या वेळेत पारंपरिक जपद्धतीने श्रीना तुपाचा अभिषेक करण्यात आला. तदनंतर सकाळी ७ वाजल्यापासून मंदिर दर्शनाकरीता खुले करण्यात आले. उत्सवानिमित्त मराठवाड्यातील लातूर व निलंगा येथून भजन व दिंडी मंडळांना आमंत्रित करण्यात आले होते. सकाळी १० वाजता श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमेश महेश इंगळे यांचे हस्ते श्रींची आरती करून पालखी मिरवणुकीचे शुभारंभ करण्यात आले.
या पालखी मिरवणुकीत वाजंत्री, भजन, दिंडी इत्यादींचा सहभाग होता. पालखी मिरवणुकीचे प्रस्थान सकाळी १० वाजता बुधवार पेठ येथील मंदिरातून निघून कारंजा चौक, मौलाली गल्ली, आझाद गल्ली, डबरे गल्ली, देशमुख गल्ली, नवश्या मारुती मार्गे मेन रोड, फत्तेसिंह चौक, सेंट्रल चौक, कापड बाजार, कारंजा चौक, विजय चौक, बस स्टॅन्ड समोरून हसापुर रोड, खासबाग, हन्नूर चौक, बुधवार पेठ येथील मंदिरात दुपारी २ वाजता पालखीचे आगमन होऊन मंदिरास पालखी प्रदक्षिणा करून पालखी सोहळ्याचा सांगता समारंभ करण्यात आला. या पालखी सोहळ्यास शहरातील हजारो भाविक व समाज बांधव उपस्थित राहून श्रींच्या दर्शनाचा व सेवेचा लाभ घेतला.
तत्पूर्वी पालखी पूजनास व आरतीस उपस्थित असलेले सोलापूर गवंडी समाजचे अध्यक्ष नागनाथ माशाळकर, अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन तथा मा.नगराध्यक्ष बसलिंगप्पा खेडगी, प्रथमेश इंगळे आदीसह मान्यवरांचा सत्कार देवस्थानचे अध्यक्ष चंद्रकांत गवंडी, व विश्वस्त श्रीमंत गवंडी, सचिव अप्पाशा गवंडी, विश्वस्त श्रीशैल गवंडी, श्रीमंत चेंडके यांचे हस्ते करण्यात आला. या प्रसंगी
समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा व विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या समाज बांधवांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यात प्रामुख्याने श्रीनिवास गवंडी यांनी विधी शाखेची पदवी प्राप्त करून सोलापूर जिल्हा न्यायालयात कार्यरत असल्याबद्दल प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते श्रीनिवास गवंडी यांचा श्रींचे कृपावस्त्र, श्रीफळ, प्रतिमा देवून सन्मान करण्यात आला.
अजय अनिल गवंडी यांची पोलीस भरती झाल्याबद्दल सेक्रेटरी अप्पाशा गवंडी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राहूल विजय गवंडी आय.टी.आय. लिपीक झाल्याबद्दल बसलिंगप्पा खेडगी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच मार्च २०२५ च्या बारावी परिक्षेतून वित्तशास्त्र शाखेत कु.नंदीनी श्रीनिवास बहिरेवार (७७%) या गुणवंत विद्यार्थिनीचा अध्यक्ष चंद्रकांत गवंडी यांच्या हस्ते तर बारावी विज्ञान शाखेतून कु.वैष्णवी अशोक गवंडी हिने ७५% गुण व सीएट मध्ये ९०% गुण घेवून आय.एम.एस. महाविद्यालयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल कु.वैष्णवी हिचा सुनिल रेवणसिध्द गवंडी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दुपारी २ वाजता सर्व भाविकांना व सेवेकऱ्यांना देवस्थानच्या वतीने भोजन महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले होते. शेकडो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी सोलापूर शहर गवंडी समाज अध्यक्ष नागनाथ माशाळकर, विश्वस्त अंबादास गुरनाळे,
श्रीकांत भिमाशंकर गवंडी, राजू गवंडी, सतीश राजापूरे, प्रकाश भंडारी, व्यंकटेश्वर देवस्थानचे अध्यक्ष चंद्रकांत गवंडी, सचिव अप्पाशा गवंडी, विश्वस्त श्रीमंत चेंडके, श्रीशैल गवंडी, सुनील गवंडी, भीमाशंकर गवंडी, अशोक गवंडी, सुनील गवंडी,
गोकुळ गवंडी, आदींसह सर्व समाजबांधव व भाविकभक्त उपस्थित होते.
उत्सवातील सर्व कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता विश्वस्त मंडळाच्या मार्गदर्शनाखाली अमोल गवंडी,
यलप्पा गवंडी, काशिनाथ राजापूरे, दौलप्पा गवंडी, परमेश्वर गवंडी, संतोष पेठकर, इरण्णा गवंडी, संतोष माने, सुधाकर गायकवाड, महांतेश गवंडी, परतरेड्डी गवंडी, राजू राजापूरे, अमरदीप साखरे, देविदास गवंडी, विजय गवंडी, विजयकुमार गुमटे, श्रीनिवास बहिरेवार, संतोष शाली, रमेश डोणुरे, खाजप्पा झंपले, दर्शन घाटगे, आदीत्य गवंडी, संतोष जमगे, शिवानंद कार्ले, राकेश गवंडी, राहुल गवंडी, राजेंद्र गवंडी, सन्मुख गवंडी, हेमंत गवंडी, वेंकटेश गवंडी , गोकुळ गवंडी, देविदास गोबरे, मल्लिकार्जुन गवंडी, डॉ.मल्लिनाथ गवंडी, वेंकट राजापुरे, श्रीशैल राजापुरे, काशिनाथ गवंडी आदींसह इतर समाज बांधवानी परिश्रम घेतले.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!