स्वातंत्र्यवीर सावरकर वाचनालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अभिवादन सभा
वागदरी, ता. अक्कलकोट (प्रतिनिधी) –
येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सार्वजनिक वाचनालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त ग्रामस्थांनी एकत्र येऊन अभिवादन सभा आयोजित केली.
कार्यक्रमात श्रीकांत सोनकवडे, सुरेश छुरे, (ग्रंथपाल),
कोटप्पा कोठे, चौळे गुरुजी, रुद्रप्पा हूगे, आप्पासाहेब दनुरे, धुळाप्पा शिरगण, सुधीर सोनकवडे यांच्यासह इतर अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थितांनी टिळक आणि अण्णाभाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले.
या कार्यक्रमात वक्त्यांनी टिळकांचे राष्ट्रकार्य व अण्णाभाऊंचे साहित्यिक व सामाजिक योगदान यावर प्रकाश टाकला. वाचनालयाच्या माध्यमातून ग्रामीण भागात अशी सांस्कृतिक आणि बौद्धिक चळवळ सुरू ठेवण्यात येत असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन स्वातंत्र्यवीर सावरकर सार्वजनिक वाचनालय व स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने करण्यात आले.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!