भगवान बुध्दानी विश्वाला शांतीचा संदेश दिला*
– प्रा. डॉ. भीमाशंकर बिराजदार
श्रीक्षेत्र तीर्थ (ता. द. सोलापूर )जीवनातील आसक्तीत दु :खाचे मूळ आहे.याची जाणीव झाली की, मनातील स्वार्थीपणा नाहीसा होण्यास मदत होते. स्वार्थ कमी झाल्यास अहंकार कमी होतो. माणूस समाजशील बनतो आणि त्यातून करुणा निर्माण होते. करूणेतून शांती निर्माण होते. हाच विचार भगवान गौतम बुद्धानी दिला. तोच विचार जगाला तारणार असल्याचे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक प्रा. डॉ. भीमाशंकर बिराजदार यांनी श्री रामलिंगेश्वर सार्वजनिक वाचनालय व रामलिंगेश्वर समाज सेवा मंडळ आयोजित बुद्ध पौर्णिमा कार्यक्रमात केले.
कार्यक्रमात बोलताना डॉ. बिराजदार पुढे म्हणाले की,
अत्त दीप भव तुझे कल्याण तुझ्या कर्माने होणार आहे. तू निष्ठेने कर्म कर, शांतीच्या मार्गाने जीवनात सुख समाधान मिळणार आहे.म्हणून शांतीचा मार्ग हा सन्मार्ग आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी भगवान गौतम बुध्दाच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशाताई बाळीकाई यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन महेश पट्टणशेट्टी यांनी केले.कार्यक्रमास शारदादेवी बिराजदार,शिवराज बिराजदार, मीनाक्षी शेळगी, सुनीता पाटील, मळसिद्ध केंगार, संकेत बाळीकाई, ओम बाळीकाई व वाचक उपस्थित होते.