देवस्थानची रुग्णसेवा व स्वामीसेवा पाहून प्रभावित झाले – डॉ.पद्मजा जोगेवार
श्री स्वामी समर्थांच्या दर्शनानंतर आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनचे सहसंचालक
डॉ.पद्मजा जोगेवार यांचे मनोगत.
अक्कलकोट, दि. ५:८:२५ (श्रीशैल गवंडी) श्री स्वामी समर्थांनी आपल्या देहरुपी अवतार कार्यातून अगाध लिलांनी अनेक रुग्णांना दिलासा देवून त्यांचे आजार बरे केले आहेत. आज त्यांचे आशिर्वाद स्वहाती घेवून वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांनी देखील श्री स्वामी समर्थ रूग्णालय स्थापन करून रुग्ण सेवा हीच स्वामी सेवा समजून येथे अनेक आरोग्य शिबीरे आयोजीत करीत आहेत ही सर्वसामान्य रुग्ण स्वामी भक्तांकरीता मोठी समाधानाची बाब आहे. या शिबीरांमुळे संबंधीत रुग्णांना स्वामी कृपेचे पाठबळ लाभत आहे. देवस्थानची ही रुग्णसेवा व स्वामीसेवा पाहून आपण प्रभावित झालो असल्याचे मनोगत महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ.पद्मजा जोगेवार यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरास भेट देवून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी डॉ.पद्मजा जोगेवार यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सत्कार केला. यावेळी डॉ.पद्मजा जोगेवार बोलत होत्या. यावेळी मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयाचे पर्यवेक्षक जगन्नाथ ढगे, विपूल जाधव, सागर गोंडाळ इत्यादी उपस्थित होते.
फोटो ओळ – डॉ.पद्मजा जोगेवार यांचा श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!