गावगाथा

*झोपेचे सोंग घेतलेल्या लोणीभापकर ग्रामपंचायत प्रशासनास जागे करण्यासाठी जन संग्राम संघटना महाराष्ट्र राज्य हलगी नाद आंदोलन करणार*

निवेदन

*झोपेचे सोंग घेतलेल्या लोणीभापकर ग्रामपंचायत प्रशासनास जागे करण्यासाठी जन संग्राम संघटना महाराष्ट्र राज्य हलगी नाद आंदोलन करणार*

लोणी भापकर ता.बारामती येथील *श्री पीरसाहेब राजेवल्ली राजे बाघसावर दर्ग्याकडे* ये – जा करण्याच्या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय आणि बिकट झाली असल्याने छोटे – मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही . रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय , बिकट झाल्यामुळे पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांना ये – जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे .
तरी सदर रस्त्याची दुरुस्ती करून सर्व भाविक भक्तांची होणारी गैरसोय दूर करणेबाबत *श्री. दादा बबन कडाळे बारामती तालुकाध्यक्ष जन संग्राम संघटना महाराष्ट्र राज्य* यांनी लोणी भापकर ग्रामपंचायत प्रशासनास निवेदन देऊनही रस्त्याची दुरुस्ती न केल्याने लोणी भापकर ग्रामपंचायत कार्यालयासमोर जन संग्राम संघटना महाराष्ट्र राज्य दिनांक.११/०८/२०२५ रोजी झोपेचे सोंग घेतलेल्या लोणीभापकर ग्रामपंचायत प्रशासनास जागे करण्यासाठी हलगी नाद आंदोलन करणार आहे .

निवेदन देतेवेळी श्री . दादा बबन कडाळे बारामती तालुकाध्यक्ष जन संग्राम संघटना महाराष्ट्र राज्य , श्री . धीरज आवाडे बारामती तालुका संपर्क प्रमुख जन संग्राम संघटना महाराष्ट्र राज्य , श्री . स्वप्निल हनुमंत थोरात संस्थापक उपाध्यक्ष जन संग्राम संघटना महाराष्ट्र राज्य , श्री . जगजीत जगन्नाथ दुर्गे प्रदेश उपाध्यक्ष जन संग्राम संघटना महाराष्ट्र राज्य , श्री . प्रदेश शेलार पश्चिम महाराष्ट्र संघटक जन संग्राम संघटना महाराष्ट्र राज्य व आदी पदाधिकारी उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button