गावगाथा

यशस्वी जीवनासाठी युवकांनी व्यवहार ज्ञान कौशल्य आत्मसात करा – डॉ.दिपक पोफळे

विचार मंथन

यशस्वी जीवनासाठी युवकांनी व्यवहार ज्ञान कौशल्य आत्मसात करा – डॉ.दिपक पोफळे

(मुरुम बातमीदार)

विचाराचे बीजारोपण करून, नाविन्याची कास धरून, माहितीचे ज्ञानामध्ये रूपांतर करून त्याला कौशल्याची जोड द्या. बुद्धिमान व्हा, तर यशाची शिखरे पार कराल. यासाठी युवकांनी व्यवहार ज्ञान कौशल्य आत्मसात करावी. असे आव्हान रोटरीचे माजी प्रांतपाल डॉक्टर दीपक पोकळे यांनी केले युवकांना केले.

येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून ची ’देशाच्या शाश्वत भविष्यासाठी युवा सक्षमीकरण’ या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय अस्वले उपजिल्हा रुग्णालय उमरगा येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ कोमल गरड महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ विलास इंगळे उपप्राचार्य डॉ पद्माकर पिटले, प्रभारी प्राध्यापक डॉ. ए एस पदमपल्ले डॉ. एस. पी. इंगळे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ भरत शेळके डॉ. अनिल देशमुख डॉ रंजना चिचोंडे एनसीसी विभागाचे कॅप्टन डॉ ज्ञानेश्वर चिटमपल्ले प्रा मुरलीधर जाधव प्रा पी आर चव्हाण प्रा ज्योती जोगदाबगे अभय भालेराव समुपदेशक, आणि प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. युवकांच्या आरोग्य सक्षमीकरणावर भर देऊन समाजात आरोग्यविषयक जनजागृती निर्माण करण्यासाठी महाविद्यालयात ’रेड रिबीन क्लब’ स्थापन करण्यात आला. त्याच्या नाम फलकाचे उद्घाटन डॉ कोमल गरड यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय अस्वले यांनी विद्यार्थ्यांना काळाची गरज ओळखून आपले ध्येय क्षेत्र निवडण्यासंबंधी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे विद्यार्थी निकिता टेकले, प्रज्वल चव्हाण यांनी केले तर प्रतिक्षा यादव यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button