गावगाथा
शैक्षणिक स्पर्धा खडतर आहे प्रयत्न करा यश मिळेल : शांभवीताई कल्याणशेट्टी
अकरावी नवोदित विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव कार्यक्रम

शैक्षणिक स्पर्धा खडतर आहे प्रयत्न करा यश मिळेल : शांभवीताई कल्याणशेट्टी
अकरावी नवोदित विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव कार्यक्रम
अक्कलकोट
माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात जगामध्ये झपाट्याने बदल होत आहेत, नवनवीन शोध लागत आहेत, शैक्षणिक स्पर्धा देखील खुप खडतर झालेली आहे, त्यासाठी कठोर परिश्रम करून ध्येय साध्य करण्यासाठी अभ्यासपूर्वक वाटचाल केल्यास यश निश्चित मिळेल असे प्रतिपादन संस्थेच्या संचालिका शांभवी कल्याणशेट्टी यांनी केले.
महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था,अक्कलकोट संचलित सौ सुरेखा कल्याणशेट्टी उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता अकरावी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संस्थेचे जेष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी होते. व्यासपीठावर सचिव मल्लिकार्जुन मसुती, सेमी विभाग प्रमुख रूपाली शहा, विज्ञान विभाग प्रमुख पूनम कोकळगी, प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे, जूनियर काॅलेजचे प्राचार्य मलकप्पा भरमशेट्टी व प्रा सौरभ भस्मे उपस्थित होते.
मल्लिनाथ कल्याणशेट्टी म्हणाले की, महाविद्यालयाचे नियम व शिस्त विद्यार्थ्यांना बंधनकारक असते ती विद्यार्थ्यांच्या भावी जीवनास मार्गदर्शक असते म्हणून अध्ययनाची देखील शिस्त लावून घेतली पाहिजे दररोज पाठ्यपुस्तक वाचले पाहिजे, संदर्भ ग्रंथाचे देखील वाचन केले पाहिजे, त्यामुळे यशाची खात्री मिळते जीवनाची वाटचाल सुखकर होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक कु प्रतीक्षा सोलंकर यांनी केले सूत्रसंचलन कु सुकन्या स्वामी
यांनी केले तर आभार श्रद्धा त्रिगुळे यांनी मानले यशस्वीतेसाठी प्राध्यापक गुरुशांत हपाळे, सलोनी शहा, सविता स्वामी, शितल फुटाणे, शितल टिंगरे, मधुबाला लोणारी, जनाबाई चौधरी, शिल्पा धूमशेट्टी, शिवकुमार मटदेवरू यांनी प्रयत्न केले.
चौकटीतील मजकूर
यश प्राप्तीसाठी सक्षम व्हा