Akkalkot : चपळगाववाडी जिल्हा परिषद शाळेचा पहिला दिवस वृक्षदिंडी, जलदिंडी,ग्रंथदिंडी व नवी पुस्तके व स्कूलबॅग वाटपाने सुरू
अक्कलकोट (प्रतिनिधी): जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चपळगाववाडी येथे आज दि.15जून 2024 वार शनिवार रोजी नवीन शैक्षणिक वर्ष 2024-25 ची सुरूवात अतिशय उत्साहात व वाजतगाजत झाली.
प्रारंभी प्रभातफेरी,ग्रंथदिंडी,जलदिंडी,वृक्षदिंडी काढून वाजतगाजत विद्यार्थी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनसर नदाफ यांच्या हस्ते फीत कापून प्रवेशोत्सव घेण्यात आला.उपाध्यक्षा कावेरी परशेट्टी यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यानंतर उपस्थित मान्यवरांकडून इयत्ता पहिलीत नवीन दाखल विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प व पाठ्यपुस्तक देऊन स्वागत करण्यात आले.
यानंतर कै.विरपाक्षप्पा सातप्पा दोड्याळे यांच्या स्मरणार्थ श्री संतोषकुमार दोड्याळे यांच्याकडून इयत्तेत.1 ली ते 4थी मधील गुणानुक्रमे प्रथम तीन विद्यार्थ्यांना पारितोषिक म्हणून स्कूलबॅग चे वाटप मान्यवरांकडून करण्यात आले. खाऊ वाटप करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.यावेळी माजी अध्यक्ष गौरीशंकर दोड्याळे,शा व्य सदस्य बापूराव गोविंदे,महंमद नदाफ,खंडाप्पा बेळ्ळे,काशिनाथ इटगळे,रेवणसिद्ध इटगळे,गुडुमाबी नदाफ यांच्यासह अनेक मान्यवर,मुख्याध्यापक व सहशिक्षक ,सर्व विद्यार्थ्यी उपस्थित होते.