Akkalkot: घोळसगांव जिल्हा परिषद शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ सन्मानाने सुरूवात

अक्कलकोट (प्रतिनिधी): जिल्हा परिषद मराठी शाळा घोळसगाव येथे आज शाळेचे पहिले दिवस उपस्थित विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले एक महिन्याच्या सुट्टीनंतर शाळेत मुलांच्या उपस्थितीने शाळेची शोभा वाढली तसेच विद्यार्थ्यांना त्या त्या वर्गाचे शिक्षकांनी नवीन पाठ्यपुस्तकांची वाटप केले शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी पहिलीच्या वर्गासाठी नवीन विद्यार्थ्यांचे ऍडमिशन देऊन त्यांचेही स्वागत केले शाळेचे मुख्याध्यापक श्री सोमनाथ मोरे सर रामेश्वर दरेकर सर अमोल गुंजोटी सर अजित ठाकूर सर शाळेमध्ये उपस्थित होते.

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामेश्वर पाटील बोलताना म्हणाले की, “चला आपण सारे ग्रामीण भागातील पालक व नागरिकांनी मिळून जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या वाढवून जिल्हा परिषद शाळा वाचवूया आता सध्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा पालकांची ओढ इंग्रजी माध्यमाच्या शाळा कडे आहे प्रत्येक गावामध्ये जिल्हा परिषद शाळांची विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत आहे याच्याकडे शासनाने देखील गंभीर लक्ष देणे गरजेचे आहे कारण असा आहे की जिल्हा परिषद शाळेमध्ये पहिली ते सातवी असे सात वर्ग असतात पण आता आपण आपल्या गावातील मराठी शाळेचे उदाहरण घेतलं तर वर्ग आहेत सात पण शिक्षक आहेत चार आणि तसल्यात चार शिक्षकांमध्ये एक शिक्षक मुख्याध्यापकाचा काम करत असतात मुख्याध्यापक म्हणताना शाळेची दप्तर लिहिणे तालुका केंद्राच्या ठिकाणच्या मिटींगला हजर राहणे असे अनेक कामे असतात त्यामुळे जिल्हा परिषद मराठी शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता सुधारण्यासाठी शासनाने लवकरात लवकर शिक्षकांची रिक्त जागा भरून शाळेची गुणवत्ता वाढवण्यास मदत करावी असे माझं मत आहे”
