देशभक्तीच्या रंगात रंगले एनटीपीसी सोलापूर – उत्साहात साजरा झाला ७९ वा स्वातंत्र्य दिन
१५ ऑगस्ट २०२५ रोजी एनटीपीसी सोलापूर येथे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम स्टेडियममध्ये ७९ वा स्वातंत्र्य दिन हरषोल्हास व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. मुख्य अतिथी एनटीपीसी सोलापूरचे प्रमुख व कार्यकारी संचालक श्री. बी जे सी शास्त्री यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

सीआयएसएफ कमांडंट व जवान, सीआयएसएफ कर्मचारी, सीआयएसएफ फायर विंग, तसेच नोट्रे डेम अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी प्रभावी संचलन व देशभक्तिप्रेरित सांस्कृतिक सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. विशेषतः कमांडो ड्रिल व अग्निसुरक्षा प्रदर्शनाने प्रेक्षकांची दाद मिळवली.
श्री. शास्त्री यांनी स्वातंत्र्य सैनिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आणि एनटीपीसी कर्मचाऱ्यांना राष्ट्रनिर्मितीत सतत योगदान देण्याचे, समर्पण व मेहनतीने पुढे जाण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमात एम. के. बेबी (मुख्य महाप्रबंधक – प्रकल्प व अनुश्रवण), एस. एस. गोखले (महाप्रबंधक – अनुश्रवण व मानव संसाधन), श्रीमती पद्मा शास्त्री, अध्यक्षा, सृजना महिला मंडळात,अधिकारी, कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय, युनियन व असोसिएशन प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समारोपात उत्कृष्ट कार्यगिरीसाठी एनटीपीसी मेरिटोरियस अवॉर्ड, तसेच स्पर्धेत विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचा शेवट “भारत माता की जय” या घोषणांनी झाला, ज्यामुळे एकता, स्वातंत्र्य आणि भाईचारेचा संदेश दुमदुमला.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!