गावगाथा

श्री स्वामी समर्थ औद्योगिक प्रशिक्षण संस्था अक्कलकोट येथे विभाजन विभिक्षिका स्मृतिदिन साजरा

दिनविशेष

श्री स्वामी समर्थ औद्योगिक प्रशिक्षण संस्था अक्कलकोट येथे विभाजन विभिक्षिका स्मृतिदिन साजरा
अक्कलकोट प्रतिनिधी
श्री स्वामी समर्थ औद्योगिक प्रशिक्षण संस्था अक्कलकोट येथे विभाजन विभिक्षिका स्मृतिदिन साजरा
करण्यात आला सदर विभाजन विभिक्षिका स्मृतिदिन कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे गटनिदेशक श्री गणेश काशीद सर होते सदर कार्यक्रमाची प्रस्तावना संस्थेचे शिल्प निदेशका सौ रेणुका गवल मॅडम यांनी केली प्रास्ताविकेमध्ये सदर विभाजन विभिक्षिका स्मृतिदिनाचे महत्त्व त्यांनी सांगितले त्यानंतर संस्थेचे ज्येष्ठ शिल्प निदेशक श्री विजय बोंगाळे सर यांनी विभिक्षिका या शब्दाचा अर्थ व त्याचे महत्त्व याचे स्मरण उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थ्यांना करून दिली सदर दिनाचे महत्त्व प्रमुख वक्ते ज्येष्ठ निदेशक श्री एमजी नदाफ सर यांनी सर्व प्रशिक्षणार्थी त्यांना समजावून सांगितले भारत देशाच्या विभाजना वेळी अनेक कुटुंबांचे अतोनात नुकसान झाले व अनेक कुटुंब उध्वस्त झाले कित्येक लाख लोकांचे यामध्ये बळी गेले व अनेक कुटुंबांचे विस्थापन झाले यावेळी नागरिकांना अनेक संघटना सामोरे जावे लागले हा दिवस अत्यंत दुःखदायक होता ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली व जे लोक बळी ठरले त्यांची आठवण आज ताजी झाली सध्या भारत देशामध्ये राहणार नागरिकांना व जनतेला याची माहिती व आठवण व्हावी म्हणून हा दिवस 14 ऑगस्ट रोजी दरवर्षी आपण विभाजन विभिक्षिका स्मृतिदिन म्हणून साजरा केला पाहिजे असे या दिनाचे महत्त्व श्री नदाफ यांनी उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थ्यांना करून दिली त्याचप्रमाणे प्रशिक्षणार्थी हे आपल्या कुटुंबामध्ये समाजामध्ये जाऊन याची माहिती सर्व नवीन नागरिकास नवीन विद्यार्थ्यांना देण्यासंबंधी सूचना श्री नदाफ यांनी सांगितले जेणेकरून आपल्या देशाचा पूर्व इतिहास नागरिकांना समजला पाहिजे त्याचे महत्त्व आपल्या सर्वांना ज्ञात असले पाहिजे याची जाणीव करून दिली सदर कार्यक्रमांमध्ये संस्थेचे शिल्पनिदेशक श्री घोडके सर सो गेजेले मॅडम श्री मंठाळे सर श्री कोणापुरे सर श्री लेंबे सर व सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते सहकार्य कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्थेचे शिल्प निदेशका सौगवल मॅडम यांनी केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button