१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त रॉबिन हूड आर्मी अक्कलकोट तर्फे अन्नदान.
अक्कलकोट: अक्कलकोट शहरातील डी.एड कॉलेजच्या पाठीमागे असलेल्या झोपडपट्टी परिसरात रॉबिन हूड आर्मी अक्कलकोट तर्फे गरीब व गरजूंना एक वेळचे जेवण देऊन स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.
मागील आठ वर्षांपासून अक्कलकोट शहरातील झोपडपट्टी परिसर ,मंदिर परिसर,बस स्टँड परिसर,दर्गा परिसर तसेच शहरातील बेघर ,रस्त्यावरील भिकारी मनोरुग्ण,विविध प्रकारच्या गरजूंना हॉटेल,लग्न,मंगल कार्यालय,वाढदिवस, तसेच नाव न सांगण्याच्या अटीवर अक्कलकोट शहरातील अनेक लोकांकडून व कार्यक्रमाच्या ठिकाणी शिल्लक राहिलेले अन्न गरजू पर्यंत पोहचविण्याचे कार्य रॉबिन हूड आर्मी अक्कलकोट कडून रोज पुरवले जात आहे.
आजच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त रॉबिन हूड आर्मी अक्कलकोट तर्फे अन्नदान उपक्रमाला
ज्योतिबा पारखे,सोहेल फरास, रशीद खिस्तके,अशरफ गोलंदाज,मुआज शेख आदी उपस्थित होते.
✍️ सोहेल फरास सामाजिक कार्यकर्ते,रॉबिन हूड आर्मी अक्कलकोट
Back to top button
×
No WhatsApp Number Found!