महेश मालक इंगळे यांचे हसापूर गावासह तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, व सांस्कृतिक क्षेत्रातील सहकार्य सदैव स्मरणात राहणारे – मा.सैनिक नागनाथ शिंदे
हसापूर येथे श्री.संत कक्कय्या जयंती उत्साहात साजरी.
श्री.संत कक्कय्या जयंती निमीत्त हसापूर
ग्रामस्थांच्या वतीने नगरसेवक महेश इंगळे यांचा सत्कार केल्याप्रित्यर्थ मा.सैनिक नागनाथ शिंदे यांचे मनोगत.
(श्रीशैल गवंडी, दि.१८/०२/२६.अ.कोट)
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक महेश मालक इंगळे यांचे हसापूर गावासह तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, व सास्कृतिक क्षेत्रातील सहकार्य सदैव स्मरणात राहणारे असल्याचे प्रतिपादन हसापूर येथील मा.सैनिक नागनाथ शिंदे यांनी केले. नुकतेच हसापूर गावात नगरसेवक महेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री संत कक्कय्या महाराज जयंती उत्सव व सप्ताह विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी मा.सैनिक नागनाथ शिंदे बोलत होते. या प्रसंगी देवस्थानचे चेअरमन तथा विद्यमान नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते मोठया भक्ती भावात श्री संत कक्कय्या महाराज यांच्या प्रतिमेची पूजा व आरती संपन्न झाली. यावेळी अक्कलकोट शहर नगरपरिषद निवडणुकीत एकाच प्रभागातून सलग
६ वेळा निवडून आल्याबद्दल नगरसेवक
महेश इंगळे यांचा श्री संत कक्कय्या महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने
उत्सव समितीचे अध्यक्ष तथा माजी सैनिक नागनाथ शिंदे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष तथा माजी सैनिक नागनाथ शिंदे, उपाध्यक्ष अरुण शिंदे, सचिव अनिल शिंदे, हसापूरचे डॉ.रामलिंगया स्वामी, मा. आरोग्य निरिक्षक, शितपती कामाठी, ग्रामपंचायत सरपंच तुळसाबाई कामाठी, गौतम घटकांबळे, उपसरपंच, दिगंबर सोनकांबळे, पोलिस पाटील, माजी सरपंच गौरीशंकर स्वामी, उपसरपंच मारुती घटकांबळे, महेश कामाठी, कोळी समाजाचे अध्यक्ष, समाज सेवक राजकुमार कामाठी, संदीप शिंदे, अमोल शिंदे, सचिन शिंदे, सदाशिव शिंदे, विष्णू शिंदे, राम शिंदे, सागर शिंदे, किशोर शिंदे, दिलीप सोनकवडे, मल्हारी सदाफुले, अंबादास धडके, शिवराज सोनकवडे आदींसह हसापूर गावातील महेश इंगळे मालक मित्र परिवार, जय हनुमान मित्र मंडळ, समस्त आर.के.ग्रुपचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळ _ नगरसेवक महेश इंगळे यांचा सत्कार करताना मा.सैनिक नागनाथ शिंदे व अन्य दिसत आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!