
गांधी बाल मंदिर हायस्कूल मध्ये दसरा – शस्त्र पूजनाचा कार्यक्रम संपन्न…

गणेश हिरवे
मुंबई प्रतिनिधी

गांधी बालमंदिर हायस्कूल कुर्ला मध्ये ३ महाराष्ट्र बटालियन आर्मी विंग एनसीसी च्या वतीने दसरा (विजयादशमी) निमित्त शस्त्र पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. सदर कार्यक्रमाचे आयोजन शाळेतील शिक्षक एनसीसी कॅडेट व एनसीसी ऑफिसर विश्वनाथ पांचाळ यांनी केले होते. विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीची, सण उत्सवाची ओळख व्हावी या दृष्टीने हा कार्यक्रम आयोजित केला होता. सदर कार्यक्रमांमध्ये शाळेतील सर्व सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.यावेळी उपस्थित सर्वांनी एकमेकांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.
