गुरू का गुरू महागुरू हवा मल्लिनाथ महाराज की जय! जयचा जयघोष करीत सुमारे सव्वा लाख भक्तांनी गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा
गुरुपौर्णिमा विशेष

अक्कलकोट दि.२१ जुलै
हर हर महादेव! बोलो भारत माता की जय! वंदे मातरम ! गुरू का गुरू महागुरू हवा मल्लिनाथ महाराज की जय! जयचा जयघोष करीत सुमारे सव्वा लाख भक्तांनी गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला.
सोलापूर पुणे या राष्ट्रीय महामार्गावरील भिगवण आणि स्वामी चिंचोली सरहद्दीवर वसलेले श्रीक्षेत्र भक्तीलिंग मल्लिनाथ महाराज देवस्थानात जय भारत माता सेवा समिती नवी दिल्लीचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदगुरू श्री ॐ हवा मल्लिनाथ महाराज यांचे दिव्य सानिध्यात गुरुपौर्णिमा यात्रा महोत्सव निमित्त विविध धार्मिक आणि देशभक्ती कार्यक्रम पार पाडला.रविवार दि.२१जुलै रोजी पहाटे पाच वाजल्या पासून रात्री उशिरा पर्यंत भक्ताचा राजा सदगुरु श्री ॐ हवा मल्लिनाथ महाराजाचा सुमारे सव्वा लाख भाविक दर्शनचा लाभ घेवून जल्लोष साजरी केली.
संसाराच्या व्यापातून थोडाकाळ विश्रांती मिळावा आणि भक्ताने आपले जिवन सार्थक करून शिव भक्तीतून देश भक्ती मार्गाकडे वळावे, या प्रमुख उद्देशाने सदगुरु श्री ॐ हवा मल्लिनाथ महाराजांनी आंध्रप्रदेश,तेलगण, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, राज्यस्थान अशा अनेक राज्यासह संपूर्ण देशभरात सुमारे सहा हजारोहून अधिक शिवलिंग मंदिर आणि जय भारत माता सेवा समिती नवी दिल्लीचे शाखा स्थापना केले आहेत. त्या पैकी भिगवण (स्वामी चिंचोली) येथील भक्तीलींग देवस्थान हे सर्वोच्च असून नवसाला पावणारा स्वयं जागृत सर्व धर्मीय श्रद्धास्थान देवस्थान आहे.

या यात्रेस देश भरातील सुमारे सव्वा लाख भाविक भक्त मोठ्या प्रमाणात गर्दी केले होते. यात्रा कमिटीचे वतीने यात्रेची जयत्त तयारी करण्यात आले होते. शनिवार दि.२० जुलै रोजी रात्रौ देशभक्ती गीत भजन भारुड इत्यादी कार्यक्रम झाला असून रविवार दि.२१ रोजी पहाटे श्री चे महापूजा, महारुद्राभिषेक, नवग्रह पूजा, होमहवन इत्यादी कार्यक्रम झाला. सकाळी आठ वाजता श्रीचे भव्य पालखी मिरवणूक विविध वाद्य समवेत काढण्यात आला.

*चौकट*

*गुरू सेवा पेक्षा देश सेवा सर्व श्रेष्ठ*
गुरू सेवा पेक्षा देश सेवा सर्व श्रेष्ठ आहे.सर्व भक्तांनी अंतकरणातून देश सेवा केला पाहिजे. इतर पूजा आणि सेवा पेक्षा देश सेवा सर्व श्रेष्ठ आहे. देश वाचला तरच आम्ही सर्व जण सुखी राहणार आहोत. देशाचे एकता परंपरा अखंडपणे राखण्यासाठी सर्वांनी देशच माझे घर देशच माझे परिवार असे समजून एकजुटीने राहिले पाहिजे.
-सदगुरु श्री ॐ हवा मल्लिनाथ महाराज
राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष जय भारत माता सेवा समिती नवी दिल्ली.
