📰 वाढदिवस साजरा करताना शाळेला दिला विकासाचा हातभार
अक्कलकोट तालुका, जि. सोलापूर – जेऊर गावचे आदर्श सेंद्रिय शेतकरी, शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य, शिक्षणप्रेमी व वृक्षसंवर्धनाचे ध्येय ठेवणारे वृक्षप्रेमी आ. बसवराज सुरेश बोरीकरजगी यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त एक वेगळा उपक्रम राबवला.
शाळेच्या भौतिक गरजा लक्षात घेऊन त्यांनी पाच हजार रुपयांचे सीलिंग फॅन व घड्याळ शाळेला भेट दिले. या उपक्रमामुळे जेऊर येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेला मोठा दिलासा मिळाला आहे.

HTML img Tag
या प्रसंगी पंचायत समिती अक्कलकोटचे शा.पो.आ. अधीक्षक आदरणीय सोमशेखर स्वामी साहेब (विस्तार अधिकारी मैंदर्गी बीट), जेऊर गावचे उपसरपंच काका पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सिद्धाराम कापसे भाऊ, समिती सदस्य, श्री. पंडित गुरव सर (शा.पो.आ. समन्वयक), गावकरी मंडळी, शाळेचे मुख्याध्यापक श्री. गंगाधर जमादार सर तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते.
या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, वाढदिवस साजरा करण्याचा हा खऱ्या अर्थाने समाजासाठी आदर्श ठरेल, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. 🌿🎂
Back to top button
×
No WhatsApp Number Found!