स्वामींच्या वास्तव्यामुळे वटवृक्ष मंदीराचा धार्मिक पर्यटन स्थान म्हणून उदय – न्यायाधीश कविता इंदलकर
(श्रीशैल गवंडी, अ.कोट, दि.२३/०८/२५)
– स्वामी समर्थांच्या अनेक भक्तांप्रमाणे माझ्या कुटूंबियांसह मलाही श्री.स्वामी समर्थांच्या जागृततेची व त्यांच्या कल्पनाशक्तीची प्रचिती आली आहे. यामुळे जीवन स्वामीमय झाले आहे. माझ्यासह अनेक भाविकांच्या जीवनात स्वामी भक्तीला अग्रस्थान असल्याने माझ्यासह तमाम स्वामी भक्तांच्या भक्तीतून स्वामी समर्थांचे मूळ स्थान असलेले येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व स्वामींच्या वास्तव्यामुळे श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचा धार्मिक पर्यटन स्थान म्हणून उदय होत असल्याचे मनोगत कोल्हापूरचे जिल्हा न्यायाधीश कविता इंदलकर यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरास सहकुटूंब भेट देवून श्री.स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी न्यायाधीश कविता इंदलकर व कुटूंबियांचा श्री.स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सन्मान केला यावेळी न्यायाधीश कविता इंदलकर बोलत होत्या. यावेळी मंदीर समितीचे विश्वस्त महेश गोगी, प्रथमेश इंगळे, प्रा.शिवशरण अचलेर, दर्शन घाटगे, श्रीशैल गवंडी, सचिन हन्नूरे, विपूल जाधव इत्यादी उपस्थित होते.
फोटो ओळ – न्यायाधीश कविता इंदलकर
व कुटूंबियांचा वटवृक्ष देवस्थानमध्ये सत्कार करताना महेश इंगळे दिसत आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!