Akkalkot : अक्कलकोटकरांची सांज ठरली अविस्मरणीय ; लोकगीत कधीच संपणार नाही, विवेकानंद प्रतिष्ठान आयोजित व्याख्यानमालेत निर्माते स्वप्नील रास्ते यांचे मनोगत

अक्कलकोट प्रतिनिधी (दि.१)- लोकगीत गावा गावापर्यंत पोहचले आहे, लोकगीत कधीच संपणारे नाही, लोक गीताचा प्रारंभ कोकणातुन झाला आहे, गायका बरोबर वादक चांगला असेल तर गायकाला स्फुर्ती चढते, दोघेही उत्तम असेल तर लांगल्या गायनाची निर्मीती होते, चोखदळ प्रेक्षक व त्यांच्या कडून मोठा प्रतिसाद मिळाल्यास कला परमोच्य शिखर गाठते, असे प्रतिपादन निर्माते संकल्पना निवेदक स्वप्निल रास्ते यांनी केले.

निर्माते व निवेदक स्वप्निल रास्ते यांच्या उत्सव लोक गीतांच्या कार्यक्रमात गायक कलाकार सुजित सोमण, वेदिका दामले अमिता घुगरी यांनी सादर केलेल्या रसीक श्रोत्यांच्या ओठावरील गीतांनी अक्कलकोटकरांची सांज अविस्मरणीय ठरली .

विवेकानंद प्रतिष्ठान अध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या वतीने गणेशोत्सवा निमित्य आयोजित व्याख्यानमालेत ५ वे पुष्प लोक गीतांच्या कार्यक्रमाने गुंफण्यात आले.

प्रारंभी दिप प्रज्वलन व प्रतिमा पुजन संचालक मल्लीनाथ कल्याणशेट्टी प्रा भिमराव साठे, मुकुंद पतकी, बसवराज शास्त्री – तिर्थ , राचप्पा वागदरे, मनोहर चव्हाण ओमप्रकाश तळेकर आदि च्या शुभहस्ते करण्यात आले निवदेक स्वप्निल रास्ते व सहकारी याचा सत्कार संचालक मल्लीनाथ कल्याणशेट्टी सर्व कलाकारांच परिचय बापुजी निंबाळकर यांनी करून दिला.

या प्रसंगी विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा आमदार सचिन कल्याणशेट्टी, शिवशरण जोजन, अशोक येणगुरे मल्लिकार्जुन आळगी अमोल कोकाटे मलकप्पा भरमशेट्टी चंद्रकांत दसले दयानंद परिचारक ,सिद्धाराम मसुती, महेश कापसे, निलकंठ कापसे मल्लीनाथ मसुती गुरुपादप्पा आळगी ओंकार पाठक महावीर येणगुरे सुनील दसले गणेश सरवसे राजशेखर उमरणीकर आदि बहुसंख्य रसिक श्रोते महिला वर्ग उपस्थित होते .