Akkalkot : खेडगीज् महाविद्यालयातील गर्ल्स काऊन्सिलींग सेल च्या वतीने “रानभाज्यांचा उत्सव” उत्साहात साजरा ; विविध प्रकारच्या रानभाज्यांचे प्रदर्शन तथा त्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले….

अक्कलकोट (प्रतिनिधी): सी.बी. खेडगीस महाविद्यालयातील गर्ल्स कौन्सिलिंग सेल यांच्या वतीने दि. 29 ऑगस्ट रोजी “रानभाज्यांचा उत्सव” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सी.बी. खेडगीस महाविद्यालयाच्या गर्ल्स काउन्सेलिंग सेलतर्फे रानभाज्यांचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

या उत्सवाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. एस. धबाले यांच्याहस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. सौ. संध्या परांजपे होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून डी. एच. बजे सर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. तसेच महाविद्यालयाचे QAC सहसमन्वयक डॉ. एसके मुरूमकर यांची विशेष उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला गर्ल्स काउन्सलिंग सेलच्या समन्वयक डॉ. गीता हारकुड यांनी मनोगत व्यक्त करत मान्यवरांचे स्वागत व प्रस्ताविक सादर केले. त्यांनी रानभाज्यांचे सांस्कृतिक महत्त्व, त्यांचा लोकजीवनाशी असलेला संबंध आणि आजच्या आरोग्यदायी जीवनशैलीत त्यांचा कसा उपयोग होऊ शकतो यावर प्रकाश टाकला. महोत्सवामध्ये पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या विविध रानभाज्यांचे प्रदर्शन लावण्यात आले. तांदुळजा, राजगिरा, कंटोळी, चक्रमुंजी, अळु, तांबडी भाजी, टाकळा, शेंडा, माठ, उंबर, आघाडा, मोठा घोळ, छोटा घोळ, पात्रेचा भाजी, कडवंची, वासनवेल, शेवगा पाने इत्यादी भाज्यांचे औषधी, पौष्टिक आणि पारंपरिक उपयोग विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.

रानभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात लोह, कॅल्शियम, जीवनसत्त्वे व तंतूमय पदार्थ असल्यामुळे त्यांचे सेवन आरोग्यास अत्यंत हितावह असल्याचे अध्यक्षस्थानी मोलाचा सल्ला दिले. ग्रामीण व आदिवासी समाजामध्ये रानभाज्या हा आहाराचा मुख्य घटक असल्याने त्यांच्या जीवनशैलीत या भाज्यांचे वेगळे महत्व असल्याचे मार्गदर्शनात अधोरेखित करण्यात आले. माहितीपूर्ण पोस्टर सादरीकरणेही आकर्षण ठरली. शेवटी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुण्यांनी संदेश दिला की, “स्थानिक रानभाज्याया केवळ परंपरेचा भाग नसून आपल्या आरोग्याचे संवर्धन करणाऱ्या संपत्ती आहेत. त्यांचे जतन करणे ही आपली जबाबदारी आहे.”

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गर्ल्स काउन्सलिंग सेलचे सदस्य डॉ. एम. आर. गुरव, प्रा. कुमारी ऋतुजा धरणे, प्रा. कुमारी कोमल बिराजदार यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एल. पी. हिंडोळे यांनी केले, तर प्रा. प्रीती चव्हाण यांनी आभार प्रदर्शन केले.या महोत्सवात महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी रानभाज्यांविषयी उपयुक्त माहिती आत्मसात करून पारंपरिक भाज्यांचे पोषणमूल्य व औषधी महत्व जाणून घेतले.