” शैक्षणिक क्षेत्रातील स्पर्धात्मक यश शाश्वत समृद्धीदायक असते ” – दिपक भिताडे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक)
अक्कलकोट शहरातील कालिका नगर येथे ” श्री कालिका देवी माता मंदिर ” येथे” श्री कालिका बागचा राजा ” श्री गणेशमूर्ती महापूजा अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्माननीय श्री दीपकजी भिताडे साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी नगरातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व श्री सिद्धप्पा कलशेट्टी सावकार व जेष्ठ मार्गदर्शक श्री उमेशजी कुलकर्णी साहेब, मार्गदर्शक श्री हावण्णा सुतार आणि भाविक बंधू-भगिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कालिका नगर विकासाचे संस्थापक मार्गदर्शक डॉ. गणपतराव कलशेट्टी यांनी केले त्यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये ” पर्यावरण पूरक ” श्री गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प उद्देश व त्या पाठीमागील अध्यात्मिक व शैक्षणिक, सामाजिक विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. सिद्धप्पा कलशेट्टी हे होते.या कार्यक्रमातून श्रीउमेशजी कुलकर्णी यांनी देखील आपले मत व्यक्त केले. या अध्यात्मिक कार्यक्रमा प्रसंगी आयोजित उपक्रमातून चांगले गुणवंत विद्यार्थी निश्चितच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातून पुढे येतील व ही एक गौरवास्पद बाब आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय श्री दीपकजी भिताडे साहेब यांनी देखील आपले विचार व्यक्त करताना विद्यार्थी बांधवांनी वर्तमान काळातील स्पर्धात्मक क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी विविध क्षेत्रातील स्पर्धात्मक गोष्टी व ज्ञान आत्मसात करावेत. आणि भविष्यकाळातील आपले जीवन समृद्धीमय बनवावेत.असे प्रभावी विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सिद्धपा कलशेट्टी. यांनी देखील आपले भावना व्यक्त करताना आजचा विद्यार्थी भक्तिमय व ज्ञानमय राहून स्पर्धात्मक प्रसंगांना सामोरे जावेत.या प्रसंगी समर्थ जाधव अथर्व पाटील प्रथमेश जोगदे अक्षत लोके मयूर खोबरे महेश जैस्वाल या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी सुमित महिंद्रकर मनोज महिंद्रकर व प्रसाद कलशेट्टी सर प्रशांत म्हेत्रे श्रीकांत उपासे शुभम हेगडे योगेश कुलकर्णी श्री अम्मर पठाण गोविंद मंद्रुपकर समाजसेवक महाळप्पा बंडगर श्री.कालिका माता देवी पुजारी श्री.अभिषेक पोतदार इत्यादी अनेक भाविक बंधू-भगिनी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे संयोजन डॉ गणपतराव कलशेट्टी यांनी केले.तर सूत्रसंचालन श्री.महाळप्पा बंडगर यांनी केले.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!