खग्रास चंद्रग्रहणानिमीत्त श्री वटवृक्ष स्वामींच्या दिनक्रमात बदल.
-
ग्रहण पर्वात स्वामी दर्शन सुरु राहील.
(श्रीशैल गवंडी, अ.कोट. दि.३/०९/२०२५)
भाद्रपद शुक्ल पक्ष १५. पौर्णिमा
दिनांक ७ सप्टेंबर २०२५ रोजी खग्रास चंद्रग्रहण आल्यामुळे पुरोहित मंदार महाराज पुजारी यांनी दिलेल्या माहितीनुसार या दिवशी येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या नित्यक्रमात व स्वामींच्या दिनक्रमात बदल करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी दिली. दिनांक ७ सप्टेंबर रोजी
ग्रहणाचे वेध दुपारी १२:३७ पासुन ग्रहण मोक्षापर्यत वेध पाळावेत अबालवृद्ध, आजारी, गर्भवतींनी सायंकाळी ५:१५ पासुन वेध पाळावेत. ग्रहण स्पर्श रात्री ९:५७ वाजता, मध्य ११:४२ वाजता व ग्रहण मोक्ष रात्री १:२७ वाजता होणार आहे. ग्रहणाचे काळ एकुण ३:३० (साडेतीन तास) असल्यामुळे दिनांक ७ सप्टेंबर रोजी मंदिरातील सायंकाळची शेजारती होणार नाही. दि. ७ सप्टेंबर रोजी ग्रहण स्पर्श सुरूवात होण्यापुर्वी रात्री ९:३० ते दि. ८ सप्टेंबर रोजी पहाटे ५ पर्यत दर्शन बंद राहील व पहाटे ५ पासून दर्शन सुविधा पुर्ववत राहील. दिनांक ८ सप्टेंबर रोजी पहाटेची काकडा आरती व भाविकांचे नित्यनियमाने होणारे अभिषेक होणार नाहीत. ग्रहण वेद काळात दिवसभर दर्शनास मंदिर चालू राहील यांची सर्व स्वामी भक्तांनी नोंद घ्यावी अशी माहिती मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी दिली.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!