गावगाथा

अक्कलकोट शहर व तालुक्यातील मुस्लिम समाजाच्या वतीने नूतन तहसीलदार यांना निवेदन

निवेदन

अक्कलकोट शहर व तालुक्यातील मुस्लिम समाजाच्या वतीने नूतन तहसीलदार यांना निवेदन

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) – दिवसें दिवस महागाई वाढत आहे डाळी खाद्यतेल मसाले आधी जीवनाशक वस्तू महागले आहेत. तरी गोरगरिबांना दैनंदिन रोजगारात सण साजरे करणे सोपे नाही.

मुस्लिम समाजाच्या मुख्य रमजान ईद सणाला सुद्धा महाराष्ट्र शासनातर्फे आनंदाचा शिधा पुरविण्यात यावा. मुस्लिम समाजाच सर्वात मोठा सण म्हणजे रमजान ईद ११ एप्रिल रोजी असून ह्या मुस्लिम समाजाच्या सणाला सुद्धा गोरगरीब बेरोजगार कष्टकरी व सर्व सामान्यांना मुस्लिम बांधवांना पण आनंदाचा शिधा देऊन मुस्लिम समाजाची ईद गोड करावा यासाठी अक्कलकोट शहर व तालुक्यातील मुस्लिम समाजाच्या वतीने भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम युथ फाऊंडेशन व अक्कलकोट युवक मुस्लिम च्या वतीने नूतन तहसीलदार विनायक मगर यांना निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र शासनाने सर्व समाजाच्या सणानिमित्त व जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा दिला आहे. गुढीपाडवा,डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती,गणेश चतुर्थी,दिवाळी, गुढीपाडवा,शिवजयंती अशा महाराष्ट्राच्या सर्व समाजाच्या मुख्य सणानिमित्त व जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा वाटप करण्याचा योग्य व मोठा निर्णय घेण्यात आला असून त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाने मुस्लिम बांधवांना ईद साठीही आनंदाचा शिधा या योजनेचा विस्तार करावा महाराष्ट्रातून धार्मिक सलोख्याची मोठी परंपरा आहे. महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की रमजान ईद निमित्त मुस्लीम बांधवांना सुद्धा आनंदाचा शिधा पुरवण्याचा निर्णय घ्यावा. त्याचबरोबर केसरी कार्डधारक यांना कोणतीही सवलती भेटत नाहीत त्यांचीही स्थिती ही बीपीएल समानच आहे ही बाब लक्षात घेऊन केशरी कार्डधारकांना देखील हा आनंदाचा शिधा मिळावा ही विशेष विनंती.
यावेळी असलम बागवान,हुसेन बागवान, सोहेल फरास, मोहसीन मोकाशी,हुजेफ बागवान,मुबारक कोरबू,समीर शेख, महंमद शिकलगार,रशीद खिस्तके, अयाज चंदनवाले,अशपाक किस्तके,ज्योतिबा जयभाऊ पारखे,वसीम कुरेशी,मौला शेख,तोफिक मुजावर,अफजल बागवान, जबार बागवान,महिबूब शेख, मुजम्मिल अन्सारी आदि मुस्लिम बांधव उपस्थित होते.
✍️ सोहेल फरास अक्कलकोट

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button