गावगाथा

अभूतपूर्व असे बनातला विठोबा या अख्यायिकाचे प्रकाशन मोठ्या थाटात संपन्न …

देवशयनी आषाढी एकादशी निमित्त प्रती पंढरपूर डाळिंब बन येथे हरी नामाच्या गजरात पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला....

अभूतपूर्व असे बनातला विठोबा या अख्यायिकाचे प्रकाशन मोठ्या थाटात संपन्न …

देवशयनी आषाढी एकादशी निमित्त प्रती पंढरपूर डाळिंब बन येथे हरी नामाच्या गजरात पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला….

बारामती तालुक्यातील पंचक्रोशी प्रकाशन प्रकाशित प्रती पंढरपूर डाळिंब बन या देवाची अख्यायिका बारामती येथील स्नुशा तसेच डाळिंब गाव माहेरवाशीण हभप.शब्दरत्न सौ शुभांगी सोमनाथ जाधव-काशीकर यांनी संकलित / संपादित केलेले बनातला विठोबा या अख्यायिका पुस्तकाचे प्रकाशन माजी आमदार रमेश आप्पा थोरात व आजी आमदार राहुल दादा कुल यांच्या शुभहस्ते सकाळी आठ वाजता पांडुरंगाची महापूजा झाल्यानंतर मोठ्या आनंदाने साजरे झाले.


माहेरातील ग्रामदैवत याबद्दल प्रत्येक मुलीला ओढ असते परंतु शुभांगी ने आपल्या श्री विठ्ठल देवस्थान ची आख्यायिका पुस्तिका रूपाने डाळिंब गावाला भेट देऊन एक प्रकारे माहेराबद्दल असणारी आस्था ही आदर्शरुपी सर्वांसमोर मांडली आहे असे वक्तव्य एल बी म्हस्के यांनी आपल्या सूत्रसंचालन मध्ये सांगितले..परिसरातून त्यांचे कौतुक केले जात होते…या कार्यक्रमाप्रसंगी माननीय सौ वैशालीताई नागवडे प्रवक्ते, माननीय सुशांत दरेकर उपसभापती, प्रशांत काळे गटविकास अधिकारी दौंड , ज्ञानोबा तुळशीराम कांचन, संतोष नेवसे ग्रामविकास अधिकारी, जी प सदस्य लक्ष्मण केसकर ,पंचायत सदस्य किसान म्हस्के, डाळिंब चे सरपंच बजरंग म्हस्के, मोहन म्हेत्रे ,तहसीलदार अरुण शेलार , विकास शेलार ,तुकाराम ताकवणे, उरुळी कांचन सरपंच बाबा कांचन, माऊली कांचन, कवयित्री दामिनी ठीग, प्राची सुतार यांच्यासह श्री विठ्ठल ट्रस्ट कार्यकर्ते ,परिसरातील नागरिक, समस्त ग्रामस्थ डाळिंब गाव आणि भावीक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र कांचन यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एल बी म्हस्के यांनी केले व आभार तानाजी म्हस्के यांनी मानले….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button