वागदरीत जिल्हा परिषद शाळकरी विद्यार्थिनींना बॅग वाटप कार्यक्रम उत्साहात
वागदरी दि. ९ सप्टेंबर
जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुलींची शाळा, वागदरी येथे चंद्रकांत अशोक शिंगे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थिनींना बॅग वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात एकूण १०४ बॅगचे वाटप करण्यात आले. यात चंद्रकांत अशोक शिंगे यांच्या वतीने ५४ बॅग, वागदरीतील एका व्यक्तीने नाव न सांगता दिलेल्या ३० बॅग तसेच शाळेकडून २० बॅग असा समावेश होता. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष मा. चंद्रशेखर मडिखबे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या बॅग विद्यार्थिनींना वाटण्यात आल्या.

HTML img Tag
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच मा. शिवानंद घोळसगाव होते. सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना श्री शिवशरणप्पा सुरवसे यांनी केली.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्री चंद्रशेखर मडिखबे, माजी शिक्षण विस्तार अधिकारी श्री बापूराव चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते श्री मारुती शिंदे, तसेच भुरीकवठे येथील सामाजिक कार्यकर्ते श्री शहाबुद्दीन शेख यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रमुख अतिथींमध्ये माजी शिक्षण विस्तार अधिकारी श्री बापूराव चव्हाण, उपसरपंच श्री पंकज सुतार, माजी सरपंच श्रीकांत भैरामडगी, तंटामुक्ती समिती अध्यक्ष श्री लक्ष्मण सलगरे, वागदरी केंद्रप्रमुख श्री बसवराज मुनोळी, भुरीकवठेचे माजी उपसरपंच श्री सिध्दाराम खुने, शिक्षण समिती अध्यक्ष श्री हनीफ मुला, ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत इंडे, वंचित बहुजन आघाडी शिरवळ शाखा अध्यक्ष दयानंद गायकवाड, कॉन्ट्रॅक्टर रवींद्र मुंदीनकेरी, तालुका संघटक श्री श्याम बनसोडे, श्री बापू मंदीनकेरी आदी मान्यवरांचा समावेश होता.
या सर्व मान्यवरांचा शाळेतर्फे शाल, हार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच माजी शिक्षण विस्तार अधिकारी श्री बापूराव चव्हाण यांच्या हस्ते विद्यार्थिनींना खाऊ वाटपही करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री गजानन सुरवसे, शिक्षणप्रेमी शिवशरणप्पा सुरवसे (अध्यक्ष – महाराष्ट्र नाभिक महामंडळ, अक्कलकोट), मुख्याध्यापक बाबासाहेब बनसोडे, सहशिक्षिका सौ. अर्चना गिरी व सौ. कविता फड यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन शिवशरणप्पा सुरवसे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक बाबासाहेब बनसोडे यांनी मानले.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!