गावगाथा
जुळे सोलापूर येथे भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन
कै. पार्वती रुद्रप्पा वाघमारे यांच्या पुण्यस्मरणार्थ हे शिबि

जुळे सोलापूर येथे भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन
जुळे सोलापूर : बाम्बे पार्क भागातील इंडियन मॉडेल पब्लिक स्कूल जवळ पार्वती क्लिनिकच्या वतीने भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कै. पार्वती रुद्रप्पा वाघमारे यांच्या पुण्यस्मरणार्थ हे शिबिर गुरुवार दि. ११ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत होणार आहे.
शिबिरामध्ये जनरल आरोग्य तपासणी, शुगर-बीपी-युरिक ॲसिड तपासणी, मोफत औषध वाटप, न्यूट्रिशन मार्गदर्शन, तज्ञ डॉक्टरांचा सल्ला आदी सेवा दिल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे १ ते १२ वर्षे वयोगटातील सर्व बालकांसाठी मोफत सुवर्णप्राशन करण्यात येणार आहे.
या शिबिराचे मार्गदर्शन डॉ. अविनाश वाघमारे (BAMS, जनरल फिजिशियन) व डॉ. श्रुतिका वाघमारे (BAMS, MPH) करणार असून, यासाठी संपर्क क्रमांक ८९८३४१४८८८ असा आहे.
शिबिरात तज्ञ डॉक्टरांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. त्यामध्ये
-
डॉ. ज्ञानेश्वर वाघमारे (MBBS)
-
डॉ. कोमल वाघमारे (MBBS)
-
डॉ. जयप्रकाश वाघमारे (MBBS)
-
डॉ. प्रीती वाघमारे (MBBS)
-
डॉ. अजिंक्य साखरे (MS)
-
डॉ. सीमा साखरे (MD Pediatric)
-
डॉ. अंजली चाबुकस्वार
-
(Nutrition & Dietitian)