वागदरी येथे मराठा योद्धे श्री.मनोज दादा जरांगे पाटील यांनी मराठ्यांना आरक्षण मिळउन दिल्याबद्द्ल विजयी जल्लोष साजरा
मराठा आरक्षण

वागदरी येथे मराठा योद्धे श्री.मनोज दादा जरांगे पाटील यांनी मराठ्यांना आरक्षण मिळउन दिल्याबद्द्ल विजयी जल्लोष साजरा

वागदरी .परमेश्वर मंदिर पासून ते शिवबसवं चौक एस. टी.स्टँड पर्यंत हलगीच्या निनादा मध्ये विजयी मिरवणूक काढण्यात आली.व स्टँड समोरील छ. शिवाजी महाराज,महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेस हार घालून या ठिकाणी छोटेखानी सभा घेण्यात आली.या वेळेला श्री.मनोज दादा जरंगे पाटील यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला.या प्रसंगी गोगाव गावचे माझी सरपंच.श्री.प्रदीप जगताप साहेब,श्री.शेळके प्रशाला वागदरीचे चेअरमन श्री.बसवराज शेळके, युवक तालुका काँगेस अध्यक्ष श्री.शिवराज पोमजी,आपल्या गावचे उप सरपंच श्री.पंकज सुतार, भाजपचे ज्येष्ठ नेते श्री.श्रीशैल ठोंबरे, मराठा समाजाचे युवा व्यक्तिमत्व श्री.सुनील सावंत,भाजपा नेते श्री संतोष पोमाजी,श्री.प्रकाश पोमाजी ,मराठा समाज ट्रस्ट चे अध्यक्ष श्री शिवाजी यशवंत सावंत,श्री.महादेव सोंकवडे मराठा तंटामुक्त उपाध्यक्ष श्री.बाबुराव मोरे,श्री.रमेश सावंत, श्री.एकनाथ माने,सोने व्यापारी कदम साहेब यांच्या सह आपला असंख्य समाज बांधव व इतर समाज बांधव,युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी मराठा आरक्षणामुळे आपल्या समाज बांधवांच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होणार असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.मराठा योद्धा मनोज दादा पाटील यांनी आपल्या समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अखंड लढा उभा केला,तो लढा येसस्वी केला त्या बद्दल समाज बांधवांनी त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली.तसेच मराठा समाज बांधवांची आरक्षणाची मागणी सरकारने मान्य केल्याबद्दल मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे,उप मुख्य मंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या सह विद्यमान सरकारचे अभिनंदन करण्यात आले.अश्या प्रकारे वागदरी मध्ये
मराठा आरक्षण मिळाल्या बद्दल समाज बांधव कडून मोठया प्रमाणात जल्लोष साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.महादेव सोंकवडे यांनी केले.🙏🙏
