कल्याणशेट्टी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा संघ युवा महोत्सवासाठी सज्ज :लोकनृत्य व पथनाट्याचा जोरदार सराव
अक्कलकोट
महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा संघ युवा महोत्सवासाठी सज्ज झाला असून लोकनृत्य, पथनाट्य कला प्रकाराचा रूपाली शहा यांच्या मार्गदर्शनाखाली कसून सराव केला जात आहे.
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्यावतीने दिनांक 7 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान सांगोला महाविद्यालय सांगोला येथे युवा महोत्सव होणार आहे, त्यासाठी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सर्वच महाविद्यालयांनी विविध कला प्रकारात सहभाग नोंदवला आहे.
मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयातील कलाकार यंदा प्रथमच लोकनृत्य कला प्रकारात आपली कला सादर करणार आहेत. त्यासाठी कलाकारांनी रूपाली शहा यांच्या मार्गदर्शनानुसार अदाकारीचा सराव करत आहेत. याशिवाय वैयक्तिक कलाप्रकारात महाविद्यालयातील कलाकारांनी नोंदणी केली आहे. महाविद्यालयातील कलाकारांनी चालू घडामोडीनुसार पथनाट्य सादर करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी सेमी इंग्लिश विभागाचे जेष्ठ शिक्षक दिगंबर जगताप हे मार्गदर्शन करत आहेत. पथनाट्याचा देखील कसून सराव सुरू आहे
वैयक्तिक कलाप्रकारात काव्यवाचन, गीत गायन, रांगोळी, मातीकाम निर्मिती, चित्र आदी कला प्रकारात सांगोला महाविद्यालयाकडे विद्यार्थ्यांनी नावे नोंदवले आहेत.
सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा भीम सोनकांबळे हे विद्यार्थ्यांना कलाप्रकारासाठी प्रोत्साहित करत आहेत. महाविद्यालयाच्या वतीने प्रा मनीषा शिंदे, डॉ शितल झिंगाडे भस्मे, प्रा सौरभ भस्मे, प्रा ओंकार घीवारे विद्यार्थ्यांना कला प्रकारात सराव करण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत.
संस्थेचे अध्यक्ष आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी, संचालिका शांभवीताई कल्याणशेट्टी, ज्येष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी, सचिव मल्लिकार्जुन मसुती, प्राचार्य डॉ एस आर लोखंडे, जूनियर विभाग पुनम कोकळगी, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी यांनी कलाकारांना शुभेच्छा दिल्या आहेत.
फोटो ओळ
कल्याणशेट्टी महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी लोकनृत्याचा सराव करतानाचे छायाचित्र
Back to top button
×
No WhatsApp Number Found!