वटवृक्ष मंदीरात ‘अशक्य ही शक्य करतील स्वामी’ या लघुपट पोस्टरचे चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते अनावरण.
के.जे.क्रिएशन आणि टीम बेळगावची प्रस्तुती व येत्या दिवाळीच्या मुहूर्तावर
लघु चित्रपट प्रदर्शीत.
अशक्य ही शक्य करतील स्वामी’ हा लघुपट
नक्कीच स्वामी भक्तांच्या काळजाचा ठाव घेईल – महेश इंगळे
(श्रीशैल गवंडी, दि.५/१०/२०२५.अ.कोट)
बेळगांव येथील के.जे.क्रिएशन आणि टीम बेळगाव प्रस्तुत स्वामी लिलेवर आधारित मराठी तिसऱ्या लघू चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण आज येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात बेळगांव येथील चित्रपटाचे मुख्य कलाकार तुकाराम पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या शुभहस्ते मोठ्या भक्तीमय वातावरणात करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना महेश इंगळे यांनी सदर लघुपटाचे चित्रीकरण बेळगाव, खानापूर परिसरात झाले आहे. यंदाच्या दिवाळी शुभमुहूर्तावर हा लघु चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ह्या चित्रपटाचे निर्माता / दिग्दर्शक बेळगावचे कुमार जाधव, सह दिग्दर्शक नागेश बोभाटे, व डी.ओ.पी./ एडिटर / कॅमरेमैन संतोष बाचीकर, साक्षी कणबर्गी (लेखक), अविनाश शिंदे (डायरेक्टर) हे आहेत, तर पांडुरंग मजूकर, निकिता कुट्रे, नागेश बोबाटे, संतोष कुमार, नामदेव कुट्रे, महेश गुरव, (स्वामी), राजू तळवार, महादेव होनगेकर, बबन भाटे, पुष्पा जाधव, निकिता कुट्ट्रे, रेश्मा दिवटे, कपिल, सूरज सर्व कलाकारांनी अभिनयाच्या माध्यमातून स्वामी समर्थांच्या कार्याचा व त्यांच्या अगाध लिलांचा प्रचार प्रसार करण्याची केलेली निस्वार्थ स्वामी सेवा नक्कीच कौतुकास्पद असून हा लघु चित्रपट नक्कीच स्वामी भक्तांच्या काळजाचा ठाव घेईल असे भावोद्गार व्यक्त केले. यावेळी सर्व कलाकारांचा मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सत्कार केला. याप्रसंगी प्रथमेश इंगळे, मंदीर समितीचे विश्वस्त महेश गोगी, पुरोहित व्यंकटेश पुजारी, श्रीशैल गवंडी, विपूल जाधव, प्रा.शिवशरण अचलेर, बाळासाहेब एकबोटे, अंकूश केत, लखन गवळी, श्रीकांत मलवे, महेश मस्कले, ऋषिकेश लोणारी व टीम बेळगांवचे वरील सर्व कलाकार आदींसह स्वामी भक्त मोठया संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळ – वटवृक्ष मंदीरात ‘अशक्य ही शक्य करतील स्वामी’ या लघुपट पोस्टरचे चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते अनावरण करतानाचे प्रसंग छायाचित्रात दिसत आहे. या प्रसंगी मुख्य कलाकार तुकाराम पवार, व्यंकटेश पुजारी, व अन्य दिसत आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!