भाविकांच्या सोयी सुविधांना व भाविकांच्या सेवेला वटवृक्ष मंदिर समितीचे प्राधान्य –
आमदार मनोज घोरपडे
(अ.कोट, दिनांक – १६/१०/२०२५)
येथील श्री स्वामी समर्थांचे मूळस्थान असलेल्या श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे कार्य हे सेवाभावी वृत्तीने व समर्पित कार्याने चालते, म्हणून भाविकांच्या सोई सुविधांना व भाविकांच्या सेवेला वटवृक्ष मंदिर समितीचे नेहमीच प्राधान्य असल्याचे मनोगत कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी आमदार मनोज घोरपडे यांचा स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा, देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी आमदार मनोज घोरपडे
बोलत होते. पुढे बोलताना आमदार मनोज घोरपडे यांनी स्वामी समर्थांच्या भक्तांची वाढती संख्या लक्षात घेऊन मंदिर समिती अहोरात्र भाविकांच्या सेवेस तत्पर आहे. गर्दीचे स्वरूप पाहून श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या मर्यादित परिसरातही वारंवार विविध प्रकारचे नियोजन असतात, त्यामुळे येणाऱ्या भाविकांचे नियोजनबद्ध स्वामी दर्शन हे सुलभतेने पार पडत आहे. अशी ही धन्य सेवा पाहून स्वामी सेवेप्रती असलेल्या मंदिर समितीच्या कार्याचं आपल्याला अभिमान असल्याचे मनोगतही
आमदार मनोज घोरपडे यांनी व्यक्त केले.
यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे स्वीयसहायक नागेश कलशेट्टी, प्रथमेश इंगळे, मंदिर समितीचे विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, बाळासाहेब एकबोटे, शिवशरण अचलेर, अमर पाटील, खाजप्पा झंपले, विपूल जाधव, संतोष जमगे, श्रीकांत मलवे आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.
फोटो ओळ – आमदार मनोज घोरपडे श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेताना व आमदार मनोज घोरपडे यांचा सत्कार करताना महेश इंगळे दिसत आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!