स्वतःचा व गावचा विकास करायचा असेल तर लोकांनी वाचलं पाहिजे ; डॉ मल्लिनाथ कलशेट्टी
वळसंग – वळसंग तालुका दक्षिण सोलापूर येथे समर्थ वाचनालयाच्या उद्घाटन प्रसंगी केले.येथे स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या वतीने सर्वांसाठी खुले व सार्वजनिक वाचनालय सुरू करण्यात आले. वाचक प्रेमींनी या वाचनालयातील पुस्तके स्वतःच स्वतःच्या हाताने घ्यावीत व वाचून झाल्यावर योग्य ठिकाणी ठेवावीत अशी सूचना ही यावेळी करण्यात आली. माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचनालयाचे उद्घाटन माजी पंचायत समिती सदस्य सोनूताई कलशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी वळसंग पोलीस स्टेशनचे नुतन प्रभारी अधिकारी राहुल डोंगरे यांचेही स्वागत स्वामी समर्थ सेवा मंडळ, सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्ट व गुरुमंतेश्वर मठ यांच्या वतीने करण्यात आले. डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांचे मी विकासयात्री हे आत्मचरित्र सहाय्यक पोलीस निरीक्षक डोंगरे यांना भेट देण्यात आले.
यावेळी वळसंग गावचे सरपंच जगदीश अंटद, माजी सरपंच श्रीशैल दुधगी,माजी सरपंच सिद्धाराम कोडले, माजी पंचायत समिती सदस्य सोनूताई कलशेट्टी, सचिव सिद्धाराम काळे, माजी उपसरपंच संगण्णा खैराटे,स्वामीनाथ कोडले, रमेश दुधगी, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक खंडू शिंदे, अल्ताफ पटेल, पंडितराध्याय हिरेमठ, रवी कलशेट्टी, सन्मुख स्वामी यांच्यासह वळसंग मधील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष माजी सरपंच महादेव होटकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!