मुंबई : (प्रतिनिधी)
गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्यानंतरही श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले व अन्नछत्र परिवाराशी आमचे ऋणानुबंध कायम असल्याचे मनोगत भावगंधर्व पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी व्यक्त केले.
मुंबई उपनगरातील विलेपार्ले (पूर्व) येथील दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहात भावगंधर्व पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या ८९व्या वर्षातील पदार्पण व हृदयेश आर्ट्सच्या ३५व्या वर्धापनदिनानिमित्त विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी व्यासपीठावर राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ना. आशिष शेलार, जेष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर व सौ. डॉ. काकोडकर, आमदार पराग आळोणी, उषाताई मंगेशकर, मिनाताई खर्डीकर, आदिनाथ मंगेशकर, हृदयेश आर्ट्सचे अध्यक्ष अविनाश प्रभावळकर, ए.बी.पी. माझा चे संपादक राजीव खांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांना “हृदयनाथ अवॉर्ड” प्रदान करून सन्मानित करण्यात आले. तसेच लता दिदींच्या अविस्मरणीय आठवणींना उजाळा देणारा “दिदी आणि मी” हा विशेष संगीत कार्यक्रम पं. हृदयनाथ मंगेशकर व गायिका विभावरी आपटे-जोशी यांनी सादर केला.
या आनंदोत्सवाला श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे काका, विश्वस्त भाऊ कापसे, खजिनदार लाला राठोड, मयुरेश पै, संतोष भोसले यांच्यासह नाशिक शिमला फूडचे शुभम नागरे, हॉटेल ओबेरॉय ट्रायडंटच्या आरतीताई लिंगायत, मर्सिडीज लॅंडमार्क कार ठाण्याच्या रुपालीताई आचरेकर, चित्रकार शुभांगताई चव्हाण (पुणे), प्रतापराव गांधी व परिवार (अक्कलकोट), दिलीपभाऊ सिध्दे, बाळासाहेब कुलकर्णी, बबलादकर, देसाई, शिवराज स्वामी, मैनोद्दीन कोरबू, प्रशांत शिंदे-साठे, सरफराज शेख, कुणाल भालेकर, रमेश हळसंगी, बाबुभाई शेख, संतोष माने, गोकुळ पाटील, असद फुलारी आदी मान्यवर व स्वामीभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविनाश प्रभावळकर यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन स्मिता गवाणकर यांनी केले.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!