गावगाथा

पंधरा वर्षांनंतर पुन्हा शाळा भरली… २०१० बॅचचा अविस्मरणीय स्नेहमेळावा वागदरी उत्साहाने साजरा

माजी विद्यार्थी मेळावा

“पंधरा वर्षांनंतर पुन्हा शाळा भरली… २०१० बॅचचा अविस्मरणीय स्नेहमेळावा वागदरी उत्साहाने साजरा

वागदरी (ता. अक्कलकोट) — काळ कितीही पुढे गेला, तरी बालपण आणि शालेय जीवनाच्या आठवणी मनातून कधीच पुसल्या जात नाहीत. त्याच आठवणींना पुन्हा उजाळा देण्यासाठी वागदरी येथील श्री एस. एस. शेळके प्रशालेच्या २०१० सालच्या बॅचने तब्बल १५ वर्षांनंतर पुन्हा एकत्र येत शाळेच्या प्रांगणात स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात साजरा केला.
या मेळाव्याचे अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक जावळे सर होते. प्रमुख पाहुणे म्हणून बसवराज मल्लीनाथ शेळके (चेअरमन) उपस्थित होते शाळेचे सध्याचे मुख्याध्यापक अनिल देशमुख सर ,मठपती सर ,गंवडी सर,कुरे सर,पुजारी सर माजी शिक्षक बागवान सर,प्रधान सर,आंदोडगी सर,यमाजी सर,लंगोटे सर, मलकपा सुतार, मुकूंद मुदनकेरी, श्रीशेल पोमाजी,चव्हाण सह शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांकडून शाळेस प्रोजेक्टर भेट देण्यात आला, ज्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण साधनांचा लाभ मिळणार आहे. या सामाजिक जाणिवेच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक झाले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या गोड आठवणींची पाने सर्वांनी उलटली. कुणी वर्गातल्या खोड्या सांगत हसले, तर कुणी शिक्षकांच्या प्रेमळ रागाच्या आठवणींनी डोळ्यांत पाणी आणले. “त्या बाकावर बसलो होतो”, “इथे शाळेचा ध्वज फडकवायचो”, “त्या झाडाखाली टिफिन खात बसायचो” — अशा असंख्य क्षणांची उजळणी होत होती.
“इतक्या वर्षांनंतर पुन्हा त्या शाळेच्या दारात उभं राहिलं, तेव्हा वाटलं जणू काळ मागे फिरला आहे,” असे अनेक माजी विद्यार्थ्यांनी भावना व्यक्त केल्या. शाळेच्या वाटसप ग्रुपमधून केवळ चॅट करणारे सगळे आज समोरासमोर भेटले होते भावनांनी भारलेला तो क्षण साऱ्यांच्या मनात कायमचा कोरला गेला.
कार्यक्रमाचे नियोजन आणि यशस्वी आयोजन माजी विद्यार्थी — पवन हंचाटे, दिलीप कटकधोंड, अमर मठपती, प्रियंका सोनकवडे,ऐश्वर्या बटगेरी, शिल्पा कलशेट्टी, शिल्पा चाटे, मल्लीनाथ बेळके, बाळू क्यार, शिवलिंग मठपती, लक्ष्मीकांत सुतार, विकास कलबुर्गी, काशीनाथ वार्ग, सैफन नदाफ, दिपक माने, चिदानंद परीट आणि इतर सर्व सहकाऱ्यांनी एकत्रितपणे केले.या सुंदर सोहळ्याचे सूत्रसंचालन सोमशरण काळे व प्रियांका सोनकवडे यांनी केले

कार्यक्रमाच्या अखेरीस सर्वांनी एकमेकांना पुन्हा भेटण्याचं आश्वासन दिलं — “असेच एकत्र येत राहू, आठवणींचं हे सोनेरी नातं कायम जपूया,” असं म्हणत भावनिक वातावरणात निरोप घेतला.
हा मेळावा केवळ भेटीचा नव्हता, तर शालेय आयुष्याच्या अमूल्य क्षणांचा पुनर्जन्म होता. पंधरा वर्षांनंतर पुन्हा शाळा भरली — आणि त्या दिवसाने सर्वांच्या मनात बालपणाचं आकाश पुन्हा उजळून टाकलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button