राज्यस्तरीय “समाजरत्न पुरस्कार – 2025” श्री. सदाशिव माळगे यांना प्रदान
पुणे प्रतिनिधी :
शिव प्रतिष्ठान, महाराष्ट्र संचलित राज्यस्तरीय “समाजरत्न पुरस्कार – 2025” हा मानाचा पुरस्कार सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे श्री. सदाशिव शरणप्पा माळगे यांना प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार वितरणाचा भव्य सोहळा पुणे येथे पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक श्री. मदनजी रेनगडे पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे पुरस्कार वितरण सिनेअभिनेत्री मा. प्रतीक्षा जाधव आणि अवघ्या ५ वर्षांच्या लहान गिरीारोहक कु. अन्वी घाडगे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
सदाशिव माळगे हे शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी सतत प्रेरणास्थान ठरले आहेत. अनेक ग्रामीण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांनी त्यांच्या करिअरचा पाया भक्कम करण्याचे कार्य केले आहे. सामाजिक जाणिवेतून प्रेरित होऊन त्यांनी विविध सामाजिक उपक्रम — पर्यावरण संवर्धन, रक्तदान शिबिरे, स्वच्छता अभियान, शैक्षणिक सहाय्य उपक्रम — राबविले आहेत.
त्यांच्या या सातत्यपूर्ण कार्याचा गौरव करत “समाजरत्न पुरस्कार” प्रदान करण्यात आला. या सन्मानामुळे त्यांच्या कार्याचा गौरव तर झाला आहेच, परंतु समाजसेवेच्या दिशेने नवे प्रेरणादायी अधिष्ठान निर्माण झाले आहे.
कार्यक्रमास प्रतिष्ठानचे पदाधिकारी, समाजसेवक, शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि माळगे यांचे सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी माळगे यांच्या कार्याचे मनापासून कौतुक केले आणि भविष्यात अधिक व्यापक सामाजिक कार्याची अपेक्षा व्यक्त केली.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!