मोठ्याळ गावातील विद्यार्थ्यांची बोर्ड फी ‘आस्ताना-ए-कलंदर’ संस्थेकडून भरली
अक्कलकोट, ता : पुणे येथील आस्ताना-ए-कलंदर सामाजिक संस्था यांच्यावतीने अक्कलकोट तालुक्यातील मोठ्याळ गावातील दहावीच्या विद्यार्थ्यांची बोर्ड परीक्षा फी भरून सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण सादर करण्यात आले.
गरीब, कष्टकरी, शेतकरी तसेच आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहत ही संस्था नेहमीच समाजोपयोगी कार्य करत आली आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ गुंजाळ (पुणे) तसेच अक्कलकोट येथील श्री स्वामीनाथ चौगुले (अक्कलकोट घडामोडी) यांच्या पुढाकाराने ही मदत मोठ्याळ गावातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आली.
या कार्यासाठी ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संस्थेचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमावेळी गावचे सरपंच कार्तिक पाटील म्हणाले, “ही मदत आमच्या गावातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्वामीनाथ चौगुले आणि त्यांच्या टीमने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे.”
माजी तंटामुक्त अध्यक्ष नूर जमादार यांनी सांगितले, “या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि कष्टकरी वर्गाचे हाल झाले आहेत. अशा कठीण काळात ‘आस्ताना-ए-कलंदर’ संस्था आणि स्वामीनाथ चौगुले यांनी केलेले हे कार्य गावकऱ्यांच्या मनात कायम स्मरणात राहील.”
Back to top button
×
No WhatsApp Number Found!